एक्स्प्लोर
दिग्दर्शक कबीर खान यांना पाक विमानतळावर चप्पल दाखवली
कराची : बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान यांना पाकिस्तानच्या कराची विमानतळावर विरोधाचा सामना करावा लागला. विमानतळावर पाकिस्तानी नागरिकांनी कबीर खान यांना चप्पल दाखवून घोषणाबाजी केली.
कबीर खान यांनी कराचीमधील एका कार्याक्रमात हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर ते कराचीहून लाहोरला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले, तेव्हा त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय काहींनी त्यांना चप्पलही दाखवली. कबीर खान आत जाईपर्यंत विरोध सुरु होता.
पाकिस्तानविरोधी चित्रपट बनवल्याचा आरोप करत कबीर खान यांच्याविरोधात शेम-शेम अशा घोषणाही करण्यात आल्या.
'फॅन्टम' चित्रपटात पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्राप्रमाणे रंगवल्याचा आरोप करत या चित्रपटाला पाकिस्तानत बंदी घालण्यात आली होती. तर गेल्या वर्षी आलेल्या 'बजरंगी भाईजान'मध्ये मात्र भारत-पाकिस्तान संबंधांना जोडणारा विषय कबीर खान यांनी हाताळला होता. या चित्रपटाने पाकिस्तानात चांगली कमाई सुद्धा केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement