एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
स्ट्रगलर ते बॉलिवूडचा खिलाडी!
बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करुन सुपरस्टार बनलेल्या मोजक्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार पहिल्या पाचमध्ये मोडतो. अफाट संघर्ष आणि अभिनय कौशल्य, सोबत काम करताना रिस्क घेण्याची तयारी, या सर्व गोष्टींमुळे अक्षय कुमारने आपला वेगळा असा एक चाहता वर्ग तयार केलाय. कोणतंही रॉयल बॅकग्राऊंड नाही किंवा कुणी गॉडफादर नाही... जे कामवलंय, ते केवळ आणि केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर.
अक्षय कुमार म्हणजेच राजीव हरी ओम भाटिया. अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अक्षयचा जन्म झाला. वडील सरकारी कर्मचारी होते. अगदी लहान वयातच अक्षयमध्ये एक कलाकार दिसू लागला होता. मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी येण्याआधी अक्षय दिल्लीतील चाँदनी चौक भागात राहत होता. मुंबईत आल्यानंतर कोळीवाडा भागात राहत असे. त्यानं डॉन बॉस्को विद्यालयात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कालसा कॉलेजमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केलं... असा आहे बॉलिूवडच्या खिलाडीचा सुरुवातीचा काळ.
खेळात आधीपासूनच रस असलेल्या अक्षयने मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण बँकॉकमध्ये घेतलं. तिथेच म्हणजे बँकॉकमध्येच अक्षय शेफ म्हणून कामाला लागला. त्यानंतर पुन्हा मुंबईत आला आणि मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण देऊ लागला. यादरम्यान अक्षयच्याच एका फोटोग्राफर विद्यार्थ्याने त्याला मॉडेलिंग करण्यास सूचवलं आणि इथेच खऱ्या अर्थाने अक्षयच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
ज्या विद्यार्थ्याने मॉडेलिंग करण्यास सूचवलं होतं, त्यानेच एका छोट्या कंपनीचं नावही सूचवलं आणि मॉडेलिंग असाईनमेंटही मिळवून दिली. कॅमेऱ्यासाठी पोज देण्यासाठी अक्षयला त्यावेळी दोन तासांचे 5 हजार रुपये मिळत असत. अक्षय कुमारचा पहिला पगार होता 4 हजार रुपये.
1991 मध्ये अक्षय कुमारचा 'सौगंध' सिनेमा आला. मात्र, तो म्हणावा तितका लोकप्रिय ठरला नाही. त्यानंतर 1992 मध्ये मॉडेलिंग करण्यादरम्यान प्रमोद चक्रवर्ती यांनी आपल्या 'दीदार' सिनेमामध्ये अक्षयला संधी दिली आणि त्याच वर्षी 'खिलाडी'ही रिलीज झाला. 'खिलाडी'ने बॉलिवूडला अस्सल 'अॅक्शनहिरो' दिला आणि सुरु झाला एका 'खिलाडी'चा संघर्षमय आण तितकाच प्रेरणादायी प्रवास...
भारतीय सिनेसृष्टीत 'खिलाडी' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अक्षय कुमारने गेल्या 25 वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल 105 हून अधिक सिनेमे केले आहेत. विशेष म्हणजे शाहरुख, सलमान, आमीर आणि अजय देवगन यांच्या सिनेमांपेक्षाही हा आकडा मोठा आहे.
केवळ अभिनय क्षेत्रातच अक्षय कुमार प्रसिद्ध नाही. मॉडेलिंग, मार्शल आर्ट्स यांसारख्या क्षेत्रातही अक्षयचं नाव आदराने घेतलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवण्यात अक्षय कुमार यशस्वी झाला आहे.
अक्षय कुमार सामाजिक जाणीव मोठ्या जबाबदारीने पार जपतो. अत्यंत संवेदनशील अभिनेता म्हणून अक्षयकडे पाहिलं जातं. खरंतर देशभरातील सर्वच राज्यांमध्ये अक्षय आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत असतो. मात्र, उदाहरणादाखल सांगायचं तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी अक्षयने मुक्तहस्ताने आर्थिक मदत केली. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हातालाही कळू नये, इतक्या मोठ्या मनाने आणि मोठ्या दिलाने अक्षय मदत करतो.
अक्षय कुमार आज 49 वा वाढदिवस साजरा करतोय. देशभरात अक्षय कुमारचा चाहता वर्गा मोठा आहे. फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावरही फॅन्स फॉलोअर्सचे मोठमोठे ग्रुप्स आहेत. त्यामुळे अक्षय कुमारचा वाढदिवस एखाद्या सणासारखा साजरा होणार, यात काही शंका नाही.
एबीपी माझाकडून अक्षय कुमारला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
रत्नागिरी
Advertisement