John Abraham : बॉलिवूडचा फिटनेस फ्रिक अभिनेता कोट्यवधींचा मालक; जॉन अब्राहमची संपत्ती पाहून अवाक् व्हाल!
John Abraham Net Worth : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) चाहता वर्ग मोठा आहे.

John Abraham Net Worth : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) चाहता वर्ग मोठा आहे. जॉनच्या प्रत्येक चित्रपटाला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. धूम, जिंदा, द व्हॉटर, गरम मसाला, दोस्ताना, हाउसफुल, वेलकम, सत्यमेव जयते आणि बाटला हाउस हे जॉनचे चित्रपट लोकप्रिय ठरले होते. जॉनचा काल (17 डिसेंबर) 49 वा वाढदिवस होता. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
जॉनचा जन्म 17 डिसेंबर 1972 मध्ये केरळ येथे झाला. मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये जॉनने शिक्षण घेतले. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिस्म' या चित्रपटामधून जॉननं अभिनक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक हिट चित्रपटांमध्ये जॉनने काम केले. त्याच्या फिटनेसला त्याच्या चाहत्यांची विशेष पसंती मिळते. 9 वर्ष बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर जॉनने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. मद्रास कॅफे आणि विकी डोनर या चित्रपटाची निर्मीती जॉनने केली.
जॉनची एकूण संपत्ती
एका रिपोर्टनुसार जॉनकडे 34 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 251 कोटी रूपयांची संपत्ती आहे. तो एका हॉटेलचा मालक देखील आहे. तसेच त्याची स्वत:ची एक फूटबॉल टीम देखील आहे. या टीमचे नाव मुंबई एअँजल फुटबॉल टीम असं आहे. 2014 मध्ये जॉननं प्रिया रुंचलसोबत लग्नगाठ बांधली.
View this post on Instagram
लवकरच जॉन अब्राहम सिद्धार्थ आनंदच्या आगामी 'पठान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात जॉनसोबतच दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान हे कलाकार देखील दिसणार आहे.
























