Jogi Trailer : दिलजीत दोसांझच्या 'जोगी' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; 1984 मधील दंगलीवर आधारित चित्रपटाचे कथानक
जोगी (Jogi) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे कथानक हे 1984 दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित असणार आहे.
Jogi Trailer : अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) जोगी (Jogi) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे कथानक हे 1984 दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित असणार आहे. दंगली दरम्यान झालेली हिंसा आणि लोकांना होणारा त्रास याचं दृष्य ट्रेलरमध्ये दिसत आहे.
16 सप्टेंबर 2022 रोजी 'जोगी' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात दिलजीतसोबतच कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अय्युब, अमायरा दस्तूर आणि हितेन तेजवानी या कलाकांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. नेटफ्लिक्सनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जोगी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ज्यांच्या अकांक्षा या मोठ्या असतात. त्यांची हिंमत तोडणे अशक्य असते. असाच आमचा जोगी आहे. मैत्री, धैर्य आणि आशेची कथा असणारा हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. '
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
चित्रपटाची निर्मिती हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी केली असून अली अब्बास आणि सुखमणी सदना यांनी लिहिलेले आहे.
दिलजीतचा चाहता वर्ग मोठा
दिलजीतचा चाहता वर्ग मोठा आहे. 2004 मध्ये 'इश्क दा उडा अड्डा' हा दिलजीतचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला. त्यावेळी या अल्बममधील दिलजीतच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर 2009 मध्ये हनी सिंहसोबतचे गोलिया हे गाणं प्रदर्शित झाले. दिलजीतने अनेक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या सूरमा, उडता पंजाब, फिल्लौरी आणि गुड न्यूज या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Entertainment News Live Updates 30 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- Pushpa : गणेशोत्सवातही साऊथच्या सिनेमांची क्रेझ, पुष्पा स्टाईल गणेश मुर्त्यांची बाजाराला भुरळ