Jawan Chaleya Song Release: 'जिंदा बंदा' नंतर 'जवान' मधील 'चलेया' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; नयनतारा आणि किंग खानच्या रोमँटिक अंदाजानं वेधलं लक्ष
आता 'जवान' (Jawan) या चित्रपटामधील 'चलेया' हे गाणं रिलीज झालं आहे.

Jawan Chaleya Song Out: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मोस्ट अवेटेड 'जवान' (Jawan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी प्रीव्ह्यू रिलीज झाला होता, ज्यामध्ये शाहरुख खानच्या वेगवेगळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते. यानंतर जवान या चित्रपटामधील 'जिंदा बंदा' हे गाणं रिलीज झालं. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता या चित्रपटामधील 'चलेया' हे गाणं रिलीज झालं आहे.
शाहरुखनं जवान या चित्रपटामधील चलेया हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या गाण्याला त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "इश्क हो बेहिसाब सा ,बेपरवाह,बेहद सा, कुछ ऐसा है जवान का प्यार." शहारुख हा बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून ओळखला जातो. चलेया या गाण्यामधील शाहरुख आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यामधील रोमान्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. शाहरुख आणि नयनतारा यांची जवान चित्रपटामधील केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी जवान या चित्रपटामधील जिंदा बंदा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. 'जिंदा बंदा' या गाण्यात शाहरुखसोबतच सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य या अभिनेत्री देखील थिरकताना दिसले. या गाण्याला कमेंट करुन अनेकांनी या गाण्याचं कौतुक केलं. आता चलेया हे जवान चित्रपटामधील दुसरं गाणं रिलीज झालं आहे.
जवान (Jawan) या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसेच दीपिका पादुकोण देखील या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे.
शाहरुखचा पठाण हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता शाहरुखचा जवान हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच त्याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
