Mili Teaser: 'फ्रिजर रुम' मध्ये अडकलेल्या तरुणीची गोष्ट; जान्हवी कपूरच्या 'मिली'चा टीझर पाहिलात?
जान्हवीचा मिली (Mili) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.
Mili Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. जान्हवीच्या ‘गुड लक जेरी’, 'रुही' आणि ‘धडक’ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जान्हवीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. जान्हवीचा मिली (Mili) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
जान्हवीनं मिली या चित्रपटामधील लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. हा लूक शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एक तासामध्ये तिचं आयुष्य बदलणार आहे.' त्यानंतर मिलीचा टीझर रिलीज झाला. टीझरमध्ये दिसत आहे की, जान्हवी एका फ्रिजर रुममध्ये अडकली आहे. या रुममधून बाहेर जाण्याचा प्रयत्न जान्हवी करत आहे. टीझरमध्ये विकी कौशलचा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) देखील दिसत आहे. जान्हवी या चित्रपटात ‘मिली नौडियाल’ या 24 वर्षाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे. तर अभिनेते मनोज पाहवा यांनी मिलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. हसलीन कौर, राजेश जैस या कलाकारांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
पाहा टीझर
'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस
मिली हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या हेलन या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जान्हवी कपूरचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
जान्हवीचे चित्रपट
जान्हवीनं 2018 मध्ये रिलीज झालेल्या धडक या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर गुंजन सक्सेनाॉ, ‘गुड लक जेरी’, 'रुही' या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. तिच्या ओटीटीवर रिलीज झालेल्या गुड लक जेरी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 29 जुलै 2022 रोजी डिज्नी प्लस हॉस्टारवर या प्लॅटफॉर्मवर गुड लक जेरी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: