एक्स्प्लोर
जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल भाजपमध्ये?
मुंबई: अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये दोघेही भाजपचा प्रचार करणार असल्याचं समजतंय.
थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात पोहोचून भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर यासंदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. या यादीत आता अभिनेत्यांचाही समावेश होण्याची चिन्हं आहेत.
'मोक्का'अंतर्गत गुन्हा दाखल पुण्याच्या गुंडाचा भाजपप्रवेश
निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जणू गुंडांना प्रवेश देण्याची चढाओढच सुरु झाल्याचं दिसत आहे. पुण्यातल्या मुळशी तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात हत्या, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे असणाऱ्या विठ्ठल शेलारला पक्षात प्रवेश देण्यात आला. विठ्ठल शेलारच्या भाजपप्रवेशाला पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते. केवळ पक्षप्रवेशच नाही, तर त्याला भोर-वेल्हा-मुळशी या भागातील युवा मोर्चाचं अध्यक्षपदही बहाल करण्यात आलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement