एक्स्प्लोर

माझं नाव ट्विंकल खन्ना, कुमार नाही... ट्विटराईटला सडेतोड उत्तर

मुंबई : लग्नानंतर माहेर आणि सासर अशी दोन्ही आडनावं लावणारी ऐश्वर्या राय-बच्चन, शिल्पा शेट्टी-कुंद्रा असो वा माहेरचीच आडनावं लावणाऱ्या माधुरी दीक्षित, रविना टंडन यासारख्या अभिनेत्री. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेक महिलांना लग्नानंतर आडनाव काय लावावं, हा प्रश्न पडतो. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने असाच प्रश्न विचारणाऱ्या एका ट्विटराईटला सडेतोड उत्तर दिलं आहे. 'माझं नाव ट्विंकल खन्ना आहे, कुमार नाही, आणि तेच कायम राहील' असं मिसेस फनीबोन्स या नावाने कॉलम लिहिणाऱ्या अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. प्रभाकर नावाच्या एका ट्विटर यूझरने अत्यंत उद्धटपणे तिला 'ट्विंकल खन्ना का? तू आता कुमार आहेस' अशी आठवण करुन दिली. यावर साहजिकच ट्विंकलचा पारा चढला आणि तिने तिच्या पद्धतीने उत्तर दिलं आहे. 'अनेक जण मला हा प्रश्न विचारतात. अर्थात हे महाशय जितका जोर देऊन विचारत आहेत, तितकंही नाही. पण खन्नाच कायम राहील' असं लिहीत #MarriedNotBranded हा हॅशटॅग ट्विंकलने ट्वीटच्या शेवटी वापरला आहे. https://twitter.com/mrsfunnybones/status/778104561848487936 अभिनेता अक्षय कुमारचं खरं नाव राजीव भाटिया आहे. ट्विंकल अक्षयचा उल्लेख करताना 'मिस्टर के' असा करते. ट्विंकल ही दिवंगत अभिनेते, सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची कन्या. 1995 मध्ये 'बरसात'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासूनच तिने ट्विंकल खन्ना हे नाव कायम ठेवलं आहे. ट्विंकलचे 'मेला', 'बादशाह', 'जुल्मी' यासारखे चित्रपट गाजले होते. 2001 मधला 'लव्ह के लिये कुछ भी करेगा' हा तिचा अखेरचा चित्रपट आहे. 2001 मध्ये अक्षय आणि ट्विंकल विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर ट्विंकल बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नाही, मात्र अक्षयच्या भूमिका असलेले 'पतियाला हाऊस', 'खिलाडी 786', 'हॉलिडे' या चित्रपटांची ती सहनिर्माती होती. त्याचप्रमाणे तिचा इंटिरियर डेकोरेशनचा व्यवसायही सुरु आहे. दोघांना 14 वर्षांचा आरव आणि तीन वर्षांची नितारा ही दोन मुलं आहेत. सध्या तिचं लेखनामध्ये करिअर सुरु असून 'मिसेस फनीबोन्स' या पुस्तकामुळे ती 2015 मधील बेस्ट सेलर लेखिका ठरली. त्याचप्रमाणे ट्विंकल तिच्या तिरकस ट्वीट्ससाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget