एक्स्प्लोर
इरफान खानच्या 'हिंदी MEDIUM' सिनेमाचा भन्नाट ट्रेलर लाँच
मुंबई: सध्याच्या युगात इंग्रजी येणं फार गरजेचं झालं आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपड करतात. या सर्व प्रवासात मुलांची आणि त्यांच्या पालकांची बरीच फरफट होते. याच विषयावर बेतलेला 'हिंदी MEDIUM' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
'आज में इंग्लिश मे बात करुंगा, क्योंकि आज इंडिया इंग्लिश है और इंग्लिश ही इंडिया है' हा डायलॉग इरफान खानचा आगामी सिनेमा 'हिंदी मीडियम'चा आहे. आपल्या मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांना काय-काय सहन करावं लागतं हे या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आपल्या मुलीला खासगी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी तिचे पालक बरीच मेहनत घेतात. त्यावेळी नेमकं काय घडतं हे टिपण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. आज देशात सगळीकडेच जवळजवळ अशीच परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांना अक्षरश: शाळांचे उंबरठे झिजवावे लागतात.
हा सिनेमा 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सबा कमर, बाल कलाकार रिषिका सहगल आणि दीपक डोबरियाल आणि इरफान खान हे प्रमुख भूमिकेत आहेत.
या ट्रेलरच्या निमित्तानं इरफान खाननं आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. 'मी शाळेत आहे की नाही हे माझ्या वर्गातील मुलांना ठाऊकही नसायचं. माझ्यावर कोणाचंही लक्ष नसायचं. जेव्हा शिक्षक माझं नाव विचारायचे तेव्हा मी उभं राहून नाव सांगायचो. पण माझा आवाज खूपच बारीक होता. त्यामुळे त्यांना ते ऐकू जायचं नाही. तेव्हा मला नेहमी ओरडा बसायचा. शाळेत असताना मी फारच लाजराबुजरा होतो.' असं इरफान म्हणाला.
दरम्यान, या सिनेमातून पालकांची आणि मुलांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सिनेमा 12 मे रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षक याला नेमका कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement