एक्स्प्लोर

आयपीएल बेटिंग : दिग्दर्शक साजिद खानचाही सहभाग?

दिग्दर्शक, अभिनेता साजिद खानचा बेटिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप अटकेतील बुकी सोनू जालान याने केला आहे.

ठाणे : ठाणे खंडणीविरोधी पथकाने उघड केलेल्या आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खाननंतर आणखी काही सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. दिग्दर्शक, अभिनेता साजिद खानही बेटिंग प्रकरणात अडकण्याची चिन्हं आहेत. सात वर्षांपूर्वी साजिद खानने आपल्या माध्यमातून क्रिकेटवर बेटिंग केल्याची माहिती अटकेत असलेला बुकी सोनू जालान याने दिली आहे. त्यामुळे बेटिंगचं बॉलिवूड कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. आयपीएल बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून अटकेत असलेला बुकी सोनू जालान याची कसून चौकशी सुरु आहे. सोनू जालानने साजिदची माहिती पोलिसांना दिल्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणात साजिद खानला लवकरच चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सोनू जालान याला ज्या होंडा सिटी गाडीतून अटक करण्यात आली होती, तिचा मालक असलेल्या समीर बुद्धा याची आज ठाणे खंडणीविरोधी पथकानं तीन तास कसून चौकशी केली. यावेळी आपला आयपीएल बेटिंगशी काहीही संबंध नसल्याचा दावा समीरने केला. समीर याचा भाऊ सोहेल बुद्धा मुंबई पोलिसात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून तो सोनू जालान याचा मास्टरमाईंड मानला जातो. त्याच्याच माध्यमातून सोनूची समीरशी ओळख झाली आणि त्यांनी 2015 साली ऑटो स्पेअरपार्ट्सची फॅक्टरी सुरु केली. यावेळी सोनू आणि समीरने एक होंडा सिटी गाडीही विकत घेतली होती. कालांतराने व्यवसाय बंद पडल्यावर ही गाडी सोनूने घेतली. मात्र ती अजूनही समीर बुद्धा याच्याच नावावर असून याच गाडीतून सोनू जालानला अटक करण्यात आल्यानं पोलिसांनी समीर याची चौकशी केली. तर उद्या या प्रकरणात चित्रपट निर्माता पराग संघवी याची ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून चौकशी केली जाणार आहे. कोण आहे साजिद खान? 1995 मध्ये 'मै भी डिटेक्टिव्ह' या मालिकेच्या सूत्रसंचालनापासून साजिद खानची कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर इक्के पे इक्का, कहने में क्या हर्ज है, साजिद नं. 1, सुपर सेल यासारख्या अनेक कार्यक्रमांचं अँकरिंग त्याने केलं. झूठ बोले कौआ काटे चित्रपटातही त्याने भूमिका केली होती. नच बलिए, इंडियाज् गॉट टॅलेंट सारख्या रिअॅलिटी शोजचं परीक्षणही साजिदने केलं आहे. 2006 मध्ये डरना जरुरी है चित्रपटातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. हे बेबी, हाऊसफुल सीरिज, हिम्मतवाला, हमशकल्स अशा चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. कोरिओग्राफर फराह खानचा साजिद भाऊ आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget