एक्स्प्लोर
भारतातले पुरुष कधीच म्हातारे होत नाहीत, पूजा भट्टचा 'त्या' अभिनेत्यांना टोला
विविध संवेदनशील विषयांवर भाष्य कारणारी अभिनेत्री पूजा भट्टने बॉलिवूडमधील अभिनेत्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. पूजा म्हणाली की, भारतातले पुरुष कधीच म्हातारे होत नाहीत.

मुंबई : विविध संवेदनशील विषयांवर भाष्य कारणारी अभिनेत्री पूजा भट्टने बॉलिवूडमधील अभिनेत्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. पूजा म्हणाली की, "बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींचे वय 40 वर्षांच्या आसपास गेले की, त्यांना चित्रपटांमध्ये कामं मिळत नाहीत. त्या तुलनेत अभिनेत्यांचे वय मात्र 40, 50 वर्ष झाले तरीही त्यांना कामं मिळत राहतात. कारण भारतीय पुरुष कधीही वृद्ध होत नाहीत". बॉलीवूडमध्ये कित्येक अभिनेते असे आहेत, ज्यांनी वयाची पन्नाशी, साठी पार केली आहे. तरिही या अभिनेत्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळते. कित्येक अभिनेत्यांना साठी ओलांडल्यानंतरही चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळत होत्या. अशा सर्व अभिनेत्यांना पूजाने उपरोधिक टोला दिला आहे. पूजा म्हणाली की, "भारतात पुरुष कधीच म्हातारे होत नाहीत. ते कायम तरुण राहतात. त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या महिलांना त्यांच्या आईची भूमिका करायला सांगितले जाते. स्वतःचे उदाहरण देताना पूजा म्हणाली की 'जख्म' चित्रपटामध्ये मी अजय देवगणच्या आईची भूमिका साकारली होती'. अजय देवगण हा पूजापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. तरिदेखील या चित्रपटात पूजाने अजयच्या आईची भूमिका केली होती. या चित्रपटात अजय देवगणसोबत सोनाली बेंद्रेने नायिकेची भूमिका निभावली होती. करिअरविषयी बोलताना पूजा म्हणाली की, मला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते. मला आर्किटेक्ट किंवा अॅस्ट्रोनॉट व्हायचे होते. पूजा भट्टचा 'सडक 2' हा चित्रपट लवकरच येणार आहे. पूजा तब्बल 18 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.
(जख्म चित्रपटाचे पोस्टर)
(जख्म चित्रपटाचे पोस्टर) आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















