एक्स्प्लोर
आयफा पुरस्कारांवर 'बाजीराव मस्तानी'ची छाप
मुंबई : बॉलिवूडमधील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या आयफा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. स्पेनमधील माद्रिद शहरात आयोजित आयफा पुरस्कार 2016 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित बाजीराव मस्तानी चित्रपटाने छाप पाडली आहे.
बाजीराव मस्तानीतील कर्तबगार बाजीरावांच्या भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंहचा सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरव करण्यात आला, तर पिकू चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. तर कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' यंदाचा सर्वोत्तम चित्रपट ठरला.
आयफा पुरस्कार 2016
सर्वोत्कृष्ट चित्रपट : बजरंगी भाईजान सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी) सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणवीर सिंग (बाजीराव मस्तानी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : दीपिका पदुकोण (पिकू) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (दिल धडकने दो) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : प्रियंका चोप्रा (बाजीराव मस्तानी) आयफा वुमन ऑफ दि इयर : प्रियंका चोप्रा सर्वोत्कृष्ट पदार्पण : अथिया शेट्टी आणि सुरज पांचोली (हिरो) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे- दम लगा के हैशा) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : पॅपॉन (मोह मोह के धागे- दम लगा के हैशा) सर्वोत्कृष्ट गीतकार : वरुण ग्रोव्हर (मोह मोह के धागे- दम लगा के हैशा)अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement