एक्स्प्लोर
अजय देवगणमुळे माझं लग्न झालं नाही : तब्बू
मुंबई : अॅक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी दिवाळीच्या मुहुर्तावर 'गोलमाल अगेन' हा चित्रपट घेऊन येत आहे. 25 वर्षानंतर पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बू रोमान्स करताना दिसणार आहेत. पण या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी तब्बूने अजय देवगणसोबतच्या तिच्या नात्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
या सिनेमातील दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तब्बूचं नाव कधीही कोणत्याही अभिनेत्यासह जोडलं नाही. पण आपल्या सिंगल रिलेशनशिप स्टेटवर तब्बूने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला. अजय देवगणमुळे मी अविवाहित आहे, असं तब्बू म्हणाली.
एका मुलाखतीत तब्बू म्हणाली की, "अजय आणि मी एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतो. अजय माझा कझिन समीर आर्याचा शेजारी आहे आणि माझा चांगला मित्रही आहे. माझ्या करिअरने वेग घेण्यास सुरुवात केली, तेव्हापासून अजय माझ्या आयुष्यात आहे. त्यानेच आमच्या नात्याचा पाया रचला. त्यावेळी समीर आणि अजय माझ्यावर कायम नजर ठेवायचे आणि माझा पाठलाग करायचे. एखाद्या मुलाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर दोघे त्याला मारण्याची धमकी देऊन पळवून लावायचे. दोघे फारच खोडकर होते. मी आज सिंगल आहे तर ते फक्त अजयमुळेच."
80-90 च्या दशकातील यशस्वी अभिनेत्री तब्बूने 1980 मध्ये आलेल्या 'बाजार'मध्ये स्पेशल अपीरियन्स केला होता. पण 1994 मध्ये तब्बूने अजय देवगणसोबत 'विजयपथ' सिनेमात काम केलं आणि तिच्या करिअरला वेगळं वळण मिळालं.
तब्बू आणि अजयने हकिकत, तक्षक, फितूर आणि दृश्यम या सिनेमात एकत्र काम केलं आहे. आता गोलमाल अगेनमध्ये तब्बू आणि अजय यांच्यासह, अर्शद वारसी, परिणीती चोप्रा, कुणाल खेमू आणि तुषार कपूर यांचीही प्रमुख भूमिका आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement