एक्स्प्लोर
एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो, एक दिवसाचा पंतप्रधानही होईन : अनिल कपूर
गोव्यात सुरु असलेल्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मास्टर क्लास विथ मि. इंडिया' या सत्रात अभिनेता अनिल कपूरची मुलाखत त्यांचीच मुलगी रिया कपूरने घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या 38 वर्षांच्या सिनेकारकीर्दीचा इतिहास उलगडला.
पणजी : नायक सिनेमात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो होतो. संधी मिळाली तर एक दिवसाचा पंतप्रधानही होईन, अशी इच्छा बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी इफ्फीमध्ये बोलून दाखवली. गोव्यात सुरु असलेल्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मास्टर क्लास विथ मि. इंडिया' या सत्रात अभिनेता अनिल कपूरची मुलाखत त्यांचीच मुलगी रिया कपूरने घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या 38 वर्षांच्या सिनेकारकीर्दीचा इतिहास उलगडला. तसंच मिस्टर इंडियासारख्या सुपरहिरोवर आधारित सिनेमा पुन्हा तयार होणार असेल तर तो करायला मला आवडेल, असंही ते म्हणाले.
नायक सिनेमात मुख्यमंत्री होतो, आता पंतप्रधान होईन
"मी नायक सिनेमात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो. संधी मिळाली तर एक दिवसाचा पंतप्रधानही होईन, असं उत्तर अनिल कपूर यांनी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला. '3 इडियट्स'सारख्या सिनेमातून पालकांनी विचार घ्यावा, मुलांना त्यांना हवे ते करु द्यावं, असं सांगून माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी भाषण देणार नाही, कारण मी मनोरंजन करतो, परंतु भूतानसारख्या देशातील सर्वजण आनंदी आहेत. मी एक दिवसाचा पंतप्रधान झालो तर भारतातील सर्व लोक आनंदी असतील हे पाहिन," असं उत्तर अनिल कपूर यांनी दिलं.
एफटीआयआयमध्ये जडणघडण
अनिल कपूर यांनी सांगितलं की, "पुण्यातील एफटीआयआयसारख्या संस्थेतून अनेक कलाकार तयार झाले. मीही त्यातूनच तयार झालेला अभिनेता आहे, असे सांगून मी सिनेमासाठी काम शोधत गेलो नाही, उलट त्या भूमिकांसाठी माझा शोध घेतला गेला. कॅमेऱ्याला सामोरे जाण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी इंडस्ट्रीचा आभारी आहे."
फिट राहण्यासाठी टिप्स
वयाच्या साठीतही हॅण्डसम दिसणाऱ्या अनिल कपूर यांनी उपस्थितांना काही टिप्सही दिल्या. कधी कधी स्वत:च्या लूकवर मेहनत घ्या, अन्यथा या इंडस्ट्रीतील लोक, लेखक, दिग्दर्शक आणि प्रेक्षकही तुम्हाला विसरु शकतात. तुम्ही फिट राहा, आनंदी राहा हाच तुमच्या यशाचा फॉर्म्युला आहे. मी आजही मॅरेथॉनमध्ये भाग घेतो. मी कामाला प्राधान्य देतो, असा कानमंत्र त्यांनी दिसा.
अनिल कपूर आणि सोनमविषयी रिया काय म्हणाली?
सोनमबद्दल बोलताना अनिल कपूर यांनी ती कामाच्या बाबतीत माझीच गुड कॉपी असल्याचं सांगितलं. तर सोनमविषयी रिया म्हणाली की, भविष्यात इंटिरिअर डिझायनिंग, स्क्रीप्ट रायटिंगयासारख्या अनेक संधी मिळतील. मी एकदाच अभिनय करण्याचा प्रयत्न केला. पण मला बहिण सोनम इतकं काम जमलं नाही.
तसंच मुलाखत घेताना आपले वडील सर्वात हॉट असल्याचं सांगताना रिया कपूरने तिच्या मैत्रिणींच्या मेसेजचा दाखला दिला. यावेळी मैत्रिणींचे मेसेज तिने वाचून दिखवले. रिया म्हणाली, "मला खायला खूप आवडते, वडिलांना अनेकदा ते आवडत नाही, पण कदाचित मी एखादं रेस्टॉरंटही सुरु करेन.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement