एक्स्प्लोर
आयटम साँग म्हणजे काय?: जरीन खान
मुंबई: आयटम साँग काय आहे हे मला माहित नाही. किंवा याला असं नाव कुणी दिलं हे देखील माहित नाही. अशी प्रतिक्रिया बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री जरीन खान हिनं दिली आहे.
'कॅरेक्टर ढिला' आणि 'रेड्डी' यासारख्या गाण्यांमध्ये सुपरस्टार सलमानसोबत दिसलेली अभिनेत्री जरीन आता रामगोपाल दिग्दर्शित 'वीरप्पन' या सिनेमातील 'खल्लास वीरप्पन' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
'मी खल्लास हे गाणं यासाठी केलं कारण की, ते मला फारच आवडलं. मी खरंच खूप खुश आहे की, मला खल्लास गाणं करायला मिळालं. मला आयटम साँगचा अर्थही माहित नाही आणि या गाण्याला आयटम साँग का म्हणतात हे देखील मला माहित नाही.' असं जरीन म्हणाली.
'हेट स्टोरी 3'च्या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, 'अशा गाण्यांना प्रमोशनल किंवा स्पेशल गाणं म्हणायला हवं. कारण की असं गाणं ती व्यक्ती करते जी त्या सिनेमाचा भाग नसते.'
हेट स्टोरी 3 सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री जरीन खान ही साई कबीरचा आगामी सिनेमा 'डिव्हाइन लव्हर्स' यामध्ये दिसून येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement