एक्स्प्लोर
साखरपुड्याच्या चर्चांवर अभिनेत्री इशा गुप्ताचं स्पष्टीकरण
मुंबई : सोशल मीडियावर साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने स्पष्टीकरण दिलं आहे. माझा साखरपुडा झाला नाही, असं स्पष्टीकरण 'जन्नत 2', 'राज 3' सारख्या सिनेमातून झळकलेली अभिनेत्री इशा गुप्ताने ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे.
इशा गुप्ताने 9 एप्रिल रोजी हिऱ्याची अंगठी बोटात असलेला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. "त्याने मला विचारलं आणि मी होकार दिला," असं कॅप्शन 30 वर्षांच्या बॉलिवूड ब्यूटीने दिलं होतं. त्यामुळे तिचा सारखपुडा झाल्याची चर्चा होती.
आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा साखरपुडा
मात्र आता खुद्द इशानेच ट्वीट करुन साखरपुड्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. "माझा साखरपुडा झालेल नाही, पण एवढ्या आकाराच्या हिऱ्याची अंगठी आवडेल," असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/eshagupta2811/status/718986590421258240 दरम्यान, इशा आतापर्यंत अनेक बॉलिवूडपटांमध्ये झळकली आहे. 'रुस्तम' आणि 'हेराफेरी 3' हे तिचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे आधी अंगठीचा फोटो शेअर करणं हा इशाचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं बोललं जात आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement