Jennifer Lopez New Home: जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेकनं घेतलं आलिशान घर; स्विमिंगपूल, जिम आणि बरंच काही, पाहा काय आहे खास
Jennifer Lopez New Home: जेनिफर आणि बेन सध्या त्यांनी घेतलेल्या बेव्हरली हिल्स येथील आलिशान घरामुळे चर्चेत आहेत.
![Jennifer Lopez New Home: जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेकनं घेतलं आलिशान घर; स्विमिंगपूल, जिम आणि बरंच काही, पाहा काय आहे खास Hollywood Jennifer Lopez Ben Affleck Couple Buy New Home Worth Rs 494 crore Los Angeles See Photos Jennifer Lopez New Home: जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेकनं घेतलं आलिशान घर; स्विमिंगपूल, जिम आणि बरंच काही, पाहा काय आहे खास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/02/37f7c8a6a3717604be25fa02a7a835161685698041759259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jennifer Lopez New Home: हॉलिवूड स्टार जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि बेन अफ्लेक (Ben Affleck) यांनी नुकतेच एक आलिशान घर घेतले आहे. जेनिफर आणि बेन सध्या त्यांनी घेतलेल्या बेव्हरली हिल्स येथील आलिशान घरामुळे चर्चेत आहेत. गेली दोन वर्षे जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक हे नव्या घराच्या शोधात होते. अखेर त्यांनी कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्स (Beverly Hills) या ठिकाणी असणारे घर घेतले आहे. या घराची किंमत किती आहे? या घरात कोण-कोणत्या खास गोष्टी आहेत? याबाबत जाणून घेऊताय...
एका रिपोर्टनुसार, जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक यांनी बेव्हरली हिल्स येथील घर जवळपास $60 million देऊन खरेदी केले आहे. या घरात 10 कार गॅरेज, स्विमिंगपूल, जिम, पिकलबॉल कोर्ट, बॉक्सिंग रिंग इत्यादी गोष्टी आहेत. बेन आणि जेनिफर यांच्या या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
बेन आणि जेनिफर (Jennifer Lopez) यांनी 2002 मध्ये एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर दोन वर्षांनी दोघेही विभक्त झाले. त्यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले. जवळपास 20 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी दुसऱ्यांदा लग्न केले. बेन आणि जेनिफर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात.
जेनिफरचे चित्रपट
काही दिवसांपूर्वी जेनिफरचा (Jennifer Lopez) द मदर (The Mother) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील जेनिफरच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हस्टलर्स, द बॉय नेक्स्ट डोअर, होम या जेनिफरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जेनिफरचा द मदर हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहू शकता. हा चित्रपट 12 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. काही दिवसांपूर्वी जेनिफरनं मेट गालामध्ये देखील हजेरी लावली होती.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Jennifer Lopez : आधी ब्रेकअप, मग 20 वर्ष डेटिंग! आता लग्नबंधनात अडकले जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)