एक्स्प्लोर
...म्हणून आमीरने सुलतानच्या आधी दंगलचं पोस्टर रिलीज केलं
मुंबईः अभिनेता आमीर खानने आपल्या आगामी 'दंगल' सिनेमाचं दुसरं पोस्टर सलमान खानचा सुलतान सिनेमा रिलीज होण्याआधी जाणीवपूर्वक लाँच केलं असल्याचं सांगितलं आहे. 'सुलतान' पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक थिएटरमध्ये जातील, त्यांना 'दंगल'चं पोस्टर दिसलं तर मोठा फायदा होईल, असं आमीरने म्हटलं आहे.
'सुलतान' ईद्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. हा एक सुपरहीट होणारा सिनेमा आहे. त्यामुळे आम्ही कमीत कमी सहा महिने अगोदर एका कोपऱ्यात उभे राहून तरी सांगू शकतो, की आम्हीही लवकरच येत आहोत, असं आमीरने म्हटलं आहे.
बॉलिवूडचा खरा स्टार कोण?
आमीरला 'दंगल'च्या पोस्टर रिलीज करतानाच्या कार्यक्रमात अनेक प्रश्न विचारण्यात आले. बॉलिवूडचा खरा स्टार कोण असा प्रश्न नेहमी विचारला जातो. यावर आमीरने उत्तर दिलं. शाहरुख, सलमान, अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दिग्गज आहेत, त्यांच्याशी माझी तुलना कधीच करत नाही, असं उत्तर आमीरने दिलं.
आमीरचा 'दंगल' सिनेमा या वर्षाच्या शेवटी 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. आमीर 'दंगल'मध्ये पहिलवानाच्या भूमिकेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement