बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेताच 107 चित्रपटांची ऑफर; डॅशिंग पर्सनॅलिटी, फिट बॉडीमुळे धर्मेंद्र अन् गोविंदानं 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिला नकार
Adventures of Tarzan Fame Actor Hemant Birje : या अभिनेत्याने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप पाडली की, त्या सुमारे 107 चित्रपटांची ऑफर मिळाली होती.
Adventures of Tarzan : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक अशा अभिनेत्याने पदार्पण केलं होतं, त्याने डेब्यु चित्रपटातूनच दिग्गज स्टार्सला टक्कर दिली होती. 80 च्या दशकात सिनेविश्वात एका अशा मराठमोळ्या अभिनेत्याने पाऊल ठेवलं ज्याने संपूर्ण बॉलिवूडकरांना घाम फोडला होता. या अभिनेत्याने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप पाडली की, त्या सुमारे 107 चित्रपटांची ऑफर मिळाली होती. सलमान खान आणि संजय दत्त सारखे अभिनेते त्याला भेटण्यासाठी पोहोचले होते. या अभिनेत्याबद्दल जाणून घ्या.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेताच 107 चित्रपटांची ऑफर
ॲडवेचर्स ऑफ टारजन हा 1985 मध्ये आलेला चित्रपट सूपरहिट ठरला होता. चित्रपटातील गाणी आणि कलाकारांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. ॲडवेचर्स ऑफ टारजन चित्रपटामुळे अभिनेता हेमंत बिर्जे रातोरात स्टार झाला होता. या चित्रपटामुळे मराठमोळ्या हेमंत बिर्जेला खूप प्रसिद्धी मिळाली. हेमंत बिर्जेच्या डॅशिंग पर्सनॅलिटीमुळे तो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला होता.
डॅशिंग पर्सनॅलिटी, फिट बॉडीमुळे मोठा चाहतावर्ग
1985 साली 'ॲडव्हेंचर ऑफ टारझन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता हेमंत बिर्जे याच्याकडे जबरदस्त पर्सनॅलिटी आणि सुपरफिट बॉडी असं फुल पॅकेज होतं. हेमंत बिर्जेच्या पहिल्याच चित्रपटाने त्याला अशी ओळख मिळवून दिली, जी मिळवण्यासाठी अनेक कलाकारांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. 'ॲडव्हेंचर ऑफ टारझन' फेम हेमंत बिर्जे त्याच्या फिट बॉडीमुळे खूप चर्चेत आला होता. त्याची पर्सनॅलिटी आणि बॉडी पाहून इंडस्ट्रीमधील इतर कलाकारांना त्यांच्या करिअरबाबत भीती वाटू लागली होती.
धर्मेंद्र अन् गोविंदानं अभिनेत्यासोबत काम करणं नाकारलं
त्या काळात हेमंत सारखी उंची आणि फिट बॉडी असलेले अभिनेते फार कमी होते. याच कारणामुळे हेमंत बिर्जे पहिल्याच चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला. त्याची बॉडी आणि अभिनय बघून इतर अभिनेत्यांना त्याचं करिअर धोक्यात येईल, अशी भीती लोकांना वाटू लागली. त्याच्या याच चांगल्या लूकमुळे तो अनेक चित्रपटांमधून बाहेर फेकला गेला. पहिल्या चित्रपटानंतर त्याला 107 चित्रपटांची ऑफर मिळाली होती, पण नंतर असं काही घडलं की त्याला चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
गोविंदा आणि धर्मेंद्र यांनी 'कौन करे कुर्बानी' या चित्रपटात हेमंतसोबत काम केलं होतं. हेमंतने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'कौन करे कुर्बानी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमंतसोबत काम करणार नाही, असं धर्मेंद्रने दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. पण नंतर दिग्दर्शकाने धर्मेंद्रला समजावून सांगितलं आणि त्यानंतर ते एकत्र काम करण्यास तयार झाले. गोविंदाबद्दल बोलताना हेमंत म्हणाला होता की, 'तो एक बदमाश होता..' तो मला शूटिंगदरम्यान म्हणाला होता की तू मला धक्का मारणार नाहीस. अनेक विनवण्या केल्यानंतर या दोघांनीही माझ्यासोबत काम केल्याचा दावा हेमंतने केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :