एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : अरबाजची निक्कीला कडकडून मिठी; भांडण मिटलं, 'टीम B ला मूर्ख बनवलं'; कसा असेल पुढला गेम प्लॅन?

Bigg Boss Marathi Season 5 : आठवडाभर सुरु असलेलं निक्की आणि अरबाजचं भांडण आता संपल्याचं पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi News Season : बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खूप कल्ला पाहायला मिळाला. निक्की आणि अरबाज यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचं या आठवड्यात पाहायला मिळालं. निक्की आणि अरबाज यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने टीम एमधील सदस्यांचे व्हिडीओ निक्कीला दाखवल्यानंतर टीम एमध्ये फूट पडली. यामुळे निक्कीने अरबाज, जान्हवी आणि वैभव यांच्या ग्रुपपासून फारकत घेतली. निक्की आणि अरबाज यांच्यात मोठा राडा झाला, ज्यामध्ये अरबाजने बिग बॉसच्या घरात तोडफोड केली. यानंतर बिग बॉसने अरबाजची कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेतली.

निक्की-अरबाजचं भांडण मिटलं

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात बीबी करंन्सीसाठी पाताळलोक टास्क पार पडला. या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये बांधलं. यामध्ये निक्की-अभिजीत, आर्या-अरबाज, वैभव-धनंजय,, जान्हवी-सूरज, अंकिता-वर्षा, पॅडी-घनश्याम अशा जोड्या पाहायला मिळाल्या. यादरम्यान, घरातील इतर सदस्यांना अरबाजला निक्कीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आठवडाभर असं चित्र पाहायला मिळालं असलं तरी, आता निक्की आणि अरबाज पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

अरबाज-निक्कीनं टीम B ला मूर्ख बनवलं

आजच्या भागाचा प्रोमा समोर आला आहे. यामध्ये निक्कीसोबतच्या भांडणाचा अरबाजला त्रास होत असल्याचं दिसत आहे. आर्या आणि अभिजीत निक्की आणि अरबाजला एकमेकांसोबत बोलून गैरसमज दूर करण्याचा सल्ला देतात, यानंतर निक्की आणि अरबाज एकमेकांसोबत बोलतात. ही बाब जान्हवीला खटकताच, तुझ्या बहिणीला तू माझ्याशी बोलतो, हे आवडत नाही, असा टोमणा मारला. यानंतर निक्की पुढे म्हणते की, अडचणी खूप येतील म्हणून मी तुला सांगते की, मैत्रीचा गोड शेवट करु. यावर अरबाज म्हणतो, मला ते नकोय.

कसा असेल पुढला गेम प्लॅन?

यानंतर रात्री घरातील इतर सर्व सदस्य झोपल्यावर अरबाज आणि निक्की वॉशरुम जवळील सोफ्यावर बोलताना दिसत आहेत. यावेळी निक्की अरबाजला म्हणते, तुला जर कुणी व्यक्ती आवडत असेल, तर रागात असताना तू त्यांच्यासाठी शब्द जपून वापर. जो तू खरा आहेस ते दाखव उगाच राक्षसासारखं नको दाखवूस. तू बोलशील माझ्याकडे 36 आहेत, ए चल, चल, चल, चल. हे करशील तू? यावर अरबाज निक्कीची माफी मागत तिला सॉरी म्हणतो. यानंतर दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या घरात पुढे काय घडणार?

दरम्यान, वैभव आणि जान्हवी मला पटत नाहीत, असं निक्कीनं अरबाजला सांगितलं. आपल्याला घरातील सदस्यांसमोर असं बोलता येणार नाही, कारण तू माझ्याशी बोललेलं त्यांना आवडत नाही. यामुळे घरात न भांडता एकमेकांशी नीट बोलायचं असं निक्की आणि अरबाज ठरवतात. आता निक्की आणि अरबाजमधील वाद मिटल्याचं घरातील इतर सदस्यांना कळणार का आणि त्यांची यावर काय प्रतिक्रिया असेल, हे पाहण्यासाठी बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत.

दरम्यान, निक्की आणि अरबाजच्या या खेळीमुळे नेटकऱ्यांनाही चांगलाच धक्का बसला आहे. निक्की आणि अरबाजने टीम बी ला मूर्ख बनवलं, असं नेटकरी कमेंटमध्ये बोलत आहेत.

Bigg Boss Marathi : अरबाजची निक्कीला कडकडून मिठी; भांडण मिटलं, 'टीम B ला मूर्ख बनवलं'; कसा असेल पुढला गेम प्लॅन?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nikki Tamboli : एरव्ही कचाकचा भांडायची, पण बिग बॉसच्या घरात आईला पाहून ढसाढसा रडली निक्की; नेमकं काय घडलेलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget