एक्स्प्लोर
'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील 'अक्षरा' शूटिंगदरम्यान जखमी
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील मुख्य अभिनेत्री हिना खानचा शूटिंगदरम्यान छोटासा अपघात झाला. यात अभिनेत्री हिना खान किरकोळ जखमी झाली आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत हिना खान 'अक्षरा' नामक लोकप्रिय भूमिका करते. ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे.
मालिकेच्या शूटिंगदरम्यान पायऱ्यांवरुन उतरताना हिना खानचा पाय घसरला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली. पायाच्या एका बोटामधून रक्त आल्यानं तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
या अपघातामुळे मालिकेचे एक दिवसाचं शूटिंग थांबवण्यात येणार होतं. मात्र, हिना खानने जखम सांभाळत शूटिंग पूर्ण केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement