Happy Birthday Sushmita Sen : 'मिस इंडिया' ते 'मिस युनिव्हर्स'; आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी सुष्मिता सेन!
Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आज 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिताने वयाच्या 18 व्या वर्षी 'मिस इंडिया'चा (Miss India) किताब जिंकला होता. तसेच ती त्या वर्षी 'मिस युनिव्हर्स'देखील झाली होती. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत सुष्मिता झळकली आहे.
सुष्मिताचा पहिलाच सिनेमा फ्लॉप
सुष्मिता 1994 साली मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर पहिल्यांदा चर्चेत आली. सुष्मिताने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला होता. महेश भट्ट यांच्या 'दस्तक' या सिनेमाच्या माध्यमातून सुष्मिताने 1997 साली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. त्यानंतर तिचा 'सिर्फ तुम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
सुष्मिताचे सुपरहिट सिनेमे -
डेव्हिड धवनच्या 'बीवी नंबर 1' या सिनेमात सुष्मिता महत्त्वाच्या भूमिकेत होती. तिचा हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि पुन्हा एकदा सुष्मिता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 'आँखे', 'समय', 'मैं हूँ ना', 'बेवफा', 'मैंने प्यार क्यूँ किया' आणि 'चिंगारी' हे सुष्मिताचे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.
सुष्मिताने 1994 साली 'मिस इंडिया' आणि 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला आहे. तसेच राजीव गांधी पुरस्कार, आयफा पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, स्टार स्क्रीन पुरस्कार आणि तीन झी सिने पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सुष्मिताला सन्मानित करण्यात आले आहे.
सुष्मिताने सिनेमांसह लग्न आणि अफेअर्समुळे अनेकदा चर्चेत असते. दिग्दर्शक विक्रम भट्ट, उद्योजक साबीर भाटिया, अभिनेता रणदीप हुडा, सिने-निर्माता मानव मेनन, क्रिकेटर वसीम अक्रम अशा अनेक लोकांसोबत सुष्मिताचे नाव जोडले गेले होते. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. सुष्मिता आपल्यापेक्षा लहान वयाच्या रोहमन सोबत रिलेशनशिपमध्ये होती.
सुष्मिता आणि ललित मोदी प्रेमकरण
ललित मोदी यांनी जुलै 2022 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सुष्मिता आणि त्यांच्या नात्याबद्दल जाहीर केलं होतं. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. सुष्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
सुष्मिता समाजात अगदी बिनधास्त वावरते. तिने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. लग्न न करताही मातृत्व अनुभवता येते हे सुष्मिता सेनने दाखवून दिले आहे. सुष्मिताचा 'ताली' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा गौरी सावंत यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या सिनेमात सुष्मिता गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या