एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'गोलमान अगेन'ची दोन दिवसात 58 कोटींची कमाई
या सिनेमाने पहिल्याच दिवशी 30.14 कोटी, तर दुसऱ्या दिवशी 28.37 कोटी अशी एकूण 58.51 कोटींची कमाई केली.
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजचा चौथा सिनेमा गोलमान अगेन रिलीज झाला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 30.14 कोटी, तर दुसऱ्या दिवशी 28.37 कोटी अशी एकूण 58.51 कोटींची कमाई केली.
या वर्षात सर्वाधिक ओपनिंगचा विक्रम ‘बाहुबली 2’ च्या नावावर आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर बॉलिवूडमध्ये या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ (21.15 कोटी) आहे.
‘’गोलमाल अगेन’ची टक्कर आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’शी आहे. मात्र ‘गोलमान अगेन’ने या सिनेमावर मात केली आहे. 19 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या आमिरच्या सिनेमाने तीन दिवसात केवळ 22.75 कोटींचा व्यवसाय केला. तर 20 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या ‘गोलमाल अगेन’ने दोन दिवसात 58.51 कोटींचा गल्ला जमवला.
अजय देवगण, तुषार कपूर, तब्बू, अरशद वारसी, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि परिणीती चोप्रा यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
दरम्यान अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडिचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हा दुसरा सिनेमा आहे. ‘सिंघम रिटर्न्स’ने पहिल्याच दिवशी 32.09 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर ‘गोलमाल अगेन’ने 30.14 कोटींचा गल्ला जमवला.
‘सिक्रेट सुपरस्टार’वर ‘गोलमाल अगेन’ची मात
आमिर खानच्या सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी 4.80 कोटी, शुक्रवारी 9.30 कोटी आणि शनिवारी 8.65 कोटी अशा 22.75 कोटींचा व्यवसाय केला. मात्र प्रेक्षकांनी ‘गोलमाल अगेन”ला पसंती दिल्याचं चित्र आहे. कारण एक दिवस उशीरा रिलीज होऊनही रोहित शेट्टीच्या सिनेमाने विक्रमी कमाई केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement