एक्स्प्लोर
'गोलमाल-4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
नवी दिल्लीः 'गोलमाल' सीरीजचा चौथा सिनेमा 'गोलमाल-4' 2017 च्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी घोषणा दिग्दर्शक रोहित शेट्टीने केली आहे. गोलमाल सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात बोलताना रोहित शेट्टीने ही घोषणा केली.
'गोलमाल'च्या सर्व सिनेमांप्रमाणेच या सिनेमातही अजय देवगण मुख्य भूमिकेत असेल, असंही रोहित शेट्टी यांनी जाहिर केलं. मात्र गरोदरपणामुळे करीना कपूर या सिनेमात नसेल असं, सांगण्यात आलं.
अशी असेल 'गोलमाल-4' ची कास्ट
अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी आतापर्यंत सहा सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'गोलमाल' सीरीजचे तिनही सिनेमे हिट ठरले होते. त्यामुळे या सीरीजचा चौथा सिनेमा आणण्याचा रोहित शेट्टीने निर्णय घेतला आहे.
करीना कपूर वगळता या सिनेमाची कास्ट जवळपास सारखीच असणार आहे. या सिनेमात तुषार कपूर, कुणाल खेमू, अर्षद वारसी, श्रेयस तळपदे ही टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'गोलमाल' सीरीजचे तिनही सिनेमा प्रेक्षकांना चांगलेच आवडले होते, त्यामुळे 'गोलमाल-4' ची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement