(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa International Film Festival : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पाच मराठी सिनेमांची निवड; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
Goa Film Festival : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट 2022 करिता 'पोटरा' , 'तिचं शहर होणं' , 'पॉंडीचेरी' , 'राख' आणि 'पल्याड' या सिनेमांची निवड झाली आहे.
Goa International Film Festival : 'गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील' (Goa International Film Festival) 'फिल्म मार्केट 2022' मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या पाच मराठी सिनेमांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली आहे.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म मार्केट 2022' मध्ये 'पोटरा' (Potra), 'तिचं शहर होणं' (Ticha Shahar Hona), 'पॉंडीचेरी' (Pondicherry) , 'राख' (rakh) आणि 'पल्याड' (Palyad) या सिनेमांची निवड झाली आहे. या सिनेमांची निवड झाल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.
'पोटरा' , 'तिचं शहर होणं' , 'पॉडीचेरी' , 'राख' आणि 'पल्याड' या पाच सिनेमांच्या निवडीसाठी पाच तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे. यात अभिनेत्री किशोरी शहाणे वीज, धीरज मेश्राम, मनोज कदम, दिलीप ठाकूर आणि लेखक न दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता. या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे 25 सिनेमाचं परीक्षण करत या पाच समितींची निवड केली आहे.
View this post on Instagram
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म मार्केट 2022' मध्ये निवड झालेल्या सिनेमांची नावे जाहीर करत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवड झालेल्या सिनेमांच्या टीमचे अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या लोकप्रिय महोत्सवात पाच मराठी सिनेमांची निवड झाल्याने मराठी सिनेसृष्टीत आनंददायी वातावरण आहे. आता सिनेसृष्टीला गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेध लागले आहेत.
संबंधित बातम्या :