VIDEO | दिशा पाटनीचा बोल्ड डान्स; चाहते घायाळ
दिशा पाटनी लवकरच सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आगामी चित्रपट 'राधे'मध्ये दिशा बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानसोबत दिसून येणार आहे.
मुंबई : दिशा पाटनी पुन्हा एकदा आपल्या डान्स परफॉर्मन्सने आपल्या चाहत्यांचं मन जिंकून घेण्यासाठी आली आहे. दिशा पाटनी चित्रपट 'बागी 3'मध्ये एक डान्स परफॉर्मन्स करणार आहे. या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. यामध्ये दिशा पाटनी अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.
दिशा पाटनीसोबत सध्या गाण्यात टायगर श्रॉफचा लूक रिलीज करण्यात आलेला नाही. या गाण्याचे बोल 'डू यू लव्ह मी' आहे. गाण्यामध्ये संगीत फार दमदार आहे. अजून संपूर्ण गाणं रिलीज झालं नाही. टायगर श्रॉफने या आपल्या इस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं आहे की, 'आज रिलीज करण्यात येणार आहे.'
या गाण्याने टीझर टायगर श्रॉफने गंमतीशीर अंदाजार शेअर केला आहे. टायगर श्रॉफ याने लिहिलं आहे, 'डू यू लव मी है सवाल, सुनो गाना ये कमाल, मच जाएगा धमाल, जब तू नाचे मेरे नाल.'
'डू यू लव्ह मी' तनिष्क बागची यांनी हे गाणं लिहिलं असून निखिता गांधी यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हा ट्रॅक ब्रिटिश रेकॉर्ड निर्माता ट्रॉयबॉयचे डू यू चा रीमेक आहे. या गाण्यामध्ये हुक लाइन व्यतिरिक्त इतर सर्व लाइन हिंदीमध्ये आहेत.
Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित
दरम्यान, 'बागी 2' मध्ये दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परंतु, यावेळी टायगरसोबत श्रद्धा कपूर रोमान्स करताना दिसणार आहे. श्रद्धा बागी सिरीजमधील पहिल्या चित्रपटात दिसून आली होती. यावेळी चित्रपटात टायगर आणि श्रद्धा व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि जॅकी श्रॉफही दिसून येणार आहे. तसेच, दिशा पाटनी लवकरच सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आगामी चित्रपट 'राधे'मध्ये दिशा बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानसोबत दिसून येणार आहे. 22 मे रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटा जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डादेखील दिसून येणार आहेत. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभु देवा करणार आहे.
संबंधित बातम्या :
'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज
'जयेशभाई जोरदार'मध्ये बोमन ईराणींची एन्ट्री; रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार
रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज
First Look : 'लाल सिंह चड्ढा'मध्ये असा असेल करीना कपूरचा लूक; नवं पोस्टर रिलीज