एक्स्प्लोर

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?

Jalgaon Crime News : जळगाव शहरातील हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे. आता याबाबत पोलीस अधीक्षकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Jalgaon Crime News : जळगावात सैराट चित्रपटातील कथानकाची पुनरावृत्ती घडली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या लोकांनी भरदिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केले. जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. मुकेश रमेश शिरसाठ (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (Dr Maheshwar Reddy) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, मुकेश शिरसाठ नावाच्या मुलाने पूजा नावाच्या मुलीचे पाच वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. ही बाब मुलीच्या घरच्यांना खटकत होती. तेव्हापासून अधून-मधून त्यांचे वाद सुरू होते. काल सकाळी मुकेशच्या घरचे आणि त्यांच्या सासरचे यांच्यामध्ये भांडण झाले. सासरच्या लोकांनी कोयत्याने मुकेशच्या मानेवर वार केले. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले आहे. 

सात आरोपींना अटक, तीन आरोपींचा शोध सुरु

याप्रकरणी पोलिसांनी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, बबलू बनसोडे, प्रकाश सोनवणे, अविनाश सुरवडे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आणखी तीन आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत. खुनातील आरोपींना पकडण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहेत. एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

दरम्यान, या हत्याकांडाने जळगाव सुन्न झाले असून परिसरात प्रचंड तणाव आहे. डोळ्यांदेखत झालेल्या मुकेशच्या हत्येनंतर रुग्णालयाबाहेर मुकेश कुटुंबीयांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. मुकेशच्या कुटुंबीयांनी टाहो फोडलाय. या घटनेच्या तीव्रतेने परिसरात तणाव निर्माण झाला असून पिंप्राळा हुडको परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला

Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Embed widget