Fighter : हृतिक-दीपिका पहिल्यांदाच एकत्र,'फायटर'च्या शूटिंगला सुरुवात
Hrithik Roshan : हृतिकच्या वाढदिवशी फायटर सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.
Fighter : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फायटर' (Fighter) असे या सिनेमाचे नाव आहे. हृतिकच्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
हृतिक-दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 'फायटर' सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. त्यामुळे हृतिक आणि दीपिका सिनेमासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहेत. हृतिक-दीपिकासह अनिल कपूरदेखील 'फायटर' सिनेमात दिसणार आहे.
'फायटर' सिनेमा पुढील वर्षी 2023 च्या 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जगभरातील सर्वोत्तम लोकेशन्सवर 'फायटर'चे शूटिंग केले जाणार आहे. हृतिकचा हा सिनेमा जॉन अब्राहमच्या आगामी सिनेमाला टक्कर देऊ शकतो. दीपिकाचा नुकताच 'गेहरांईया' (Gehraiyaan) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
लवकरच हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात हृतिक डॅशिंग लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक सैफ अली खान बरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'VIKRAM VEDHA': SAIF FIRST LOOK TOMORROW... Team #VikramVedha will unveil #FirstLook of #SaifAliKhan as #Vikram from #VikramVedha tomorrow [24 Feb 2022]. #HrithikRoshan #BhushanKumar #RelianceEntertainment #VikramFirstLook pic.twitter.com/yPH4k4T1ex
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2022
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
Salman Khan : सलमान खान करत होता 'या' आजाराचा सामना; म्हणाला, 'मनात आत्महत्येचे विचार येत होते'
Gangubai Kathiawadi : ढोलिडानंतर गंगूबाई काठियावाडीमधील 'झूमे रे गोरी'गाणं रिलीज ; आलियाच्या डान्सनं वेधलं लक्ष
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha