एक्स्प्लोर
प्रख्यात व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं मुंबईत निधन

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं निधन झालं आहे. अचानक छातीत दुखू लागल्यानंतर होनप यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. नंदू होनप यांच्या निधनाने संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
नंदू होनप शनिवारी मुंबईत एका संगीत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याचवेळी त्यांच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी होनप यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
नंदू होनप हे प्रामुख्याने दत्तावरील भक्तीमय गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी दत्तावरील अनेक गाण्यांना संगीत दिलं होतं. गायक अजित कडकडे यांच्या आवाजातलं 'निघालो घेऊन दत्ताची पालखी..' हे गाणं होनप यांनीच संगीतबद्ध केले होते. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
























