Imroz And Amrita Pritam: प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन; अमृता प्रीतम यांच्याशी होते खास कनेक्शन
Imroz And Amrita Pritam: इमरोज (Imroz) यांनी वयाच्या 97 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Imroz And Amrita Pritam: आज प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज (Imroz) यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्यांनी वयाच्या 97 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंह होते. अमृता प्रीतम यांच्यासोबतच्या नात्यानंतर इमरोज हे चर्चेत आले होते. तथापि, इमरोज आणि अमृता या दघांनी कधीही लग्न केले नाही, परंतु ते 40 वर्षे एकमेकांसोबत राहिले.
इमरोज यांच्या निधनानंतर कॅनडातील इक्बाल महल यांनी शोक व्यक्त केला ते म्हणाले की, "मी त्यांना 1978 पासून वैयक्तिकरित्या ओळखत आहेत. अमृता त्यांना 'जीत' म्हणायची"
जाणून घ्या इमरोज यांच्याबद्दल
इमरोज यांचा जन्म 1926 मध्ये लाहोरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात झाला. इमरोज यांनी जगजीत सिंह यांच्या 'बिरहा दा सुलतान' आणि बीबी नूरनच्या 'कुली रह विचार'सह अनेक प्रसिद्ध एलपीचे मुखपृष्ठ डिझाइन केले होते.
इमरोज आणि अमृता यांची कहाणी
अमृता प्रीतम या त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ डिझाइन करण्यासाठी आर्टिस्टला शोधत असताना त्यांची भेट इमरोज यांच्यासोबत झाली. अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि हिंदीमध्ये कविता आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी 100 हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या काही प्रसिद्ध कलाकृती फाइव्ह इयर्स लाँग रोड, पिंजर, अदालत, कोरे कागज, उंचास दिन, सागर और सिपियां या आहेत.
1935 मध्ये अमृताचे लग्न लाहोरचे प्रीतम सिंह यांच्याशी झाले होते. दोघांनाही मुले झाली. 1960 मध्ये अमृता आणि प्रीतम यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमृता प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या प्रेमात पडली, पण साहिरच्या आयुष्यात एक महिला आल्याने दोघेही एकत्र राहू शकले नाहीत. यानंतर अमृताच्या आयुष्यात चित्रकार आणि लेखक इमरोज आले जे अमृताच्या प्रेमात पडले. असं म्हटलं जातं की अमृता या म्हणत होत्या की. साहिर माझ्या आयुष्याचे आकाश आहे आणि इमरोज माझ्या घराचे छप्पर आहे.
अमृता आणि इमरोज यांच्या वयात सात वर्षांचे अंतर
अमृता आणि इमरोज यांच्या वयात सात वर्षांचा फरक होता. 2005 मध्ये अमृताचे निधन झाले. मृत्यूपूर्वी अमृताने इमरोजसाठी 'मी तुला पुन्हा भेटेन' अशी कविता लिहिली होती. त्याच वेळी, इमरोज त्याच्या मृत्यूनंतर लवकरच कवी बनला. त्यांनी अमृतावरची प्रेमकविता पूर्ण केली - 'तिने देह सोडला, संगती नाही.'
संबंधित बातम्या: