एक्स्प्लोर

Exclusive | सुशांतच्या नोकराचा धक्कादायक खुलासा; रिया घर सोडताना अशी होती सुशांतची रिअॅक्शन

भिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकणामुळे संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. आत्महत्येला बराच काळा लोटल्यानंतरही अद्याप आत्महत्येमागील खरं कारण स्पष्ट झालेलं नाही.

मुंबई : सध्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं असून बॉलिवूड विश्वात प्रचंड खळबळ माजली आहे. साधारणपणे दीड वर्ष सुशांत सिंह राजपूतच्या घरी काम करणाऱ्या सुशांतच्या नोकराने काही बाबींचा खुलासा केला आहे. नीरज सिंह सुशांतच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत त्याच्या घरी काम करत होता. सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी नेमकं काय घडलं? याचा त्याने एबीपी न्यूजसमोर खुलासा केला आहे.

सुशांत त्या दिवशी दरवाजा उघडत नसल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडल्यानंतर सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. आत्महत्येपूर्वी सुशांत ज्यावेळी आपल्या खोलीतून बाहेर आला होता. त्यावेळी नीरजने त्याला थंड पाणी प्यायला दिले होते. ही सुशांतसोबत त्याची शेवटची भेट होती. त्यानंतर सुशांत खोलीत गेल्यापासून खोलीचं दार तोडेपर्यंतचा घटनाक्रम नीरजने सविस्तर सांगितला.

नीरजने सांगितलं की, एक दिवस अगोदर म्हणजेच, 13 जून रोजी घरात कोणतीच पार्टी झाली नव्हती. घरातील सर्वच नोकर घरातच होते. 8 जून रोजी रिया ज्यावेळी घर सोडून गेली, त्यावेळी कोणतंही भांडण झाल्याचं नीरजने पाहिलं नसल्याचं सांगितलं. नीरजचं म्हणणं आहे की, लहान-लहान गोष्टी कपल्समध्ये घडतच असतात. यात काही मोठी गोष्ट नाही. दीड वर्षांपर्यंत त्या दोघांमध्ये कोणतंही भांडण झाल्याचं मी पाहिलं नाही.

नीरजने सांगितलं की, रिया घर सोडून जात होती तेव्हा सुशांत त्याच्या खोलीतच होता आणि रिया कपड्यांनी भरलेली बॅग घेऊन गेली होती. लॅपटॉप आणि मेडिकल फाईल्सबाबत कोणतीही माहिती नाही. सुशांत आणि रिया एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. सुशांत प्रत्येक गोष्ट रियाला विचारत असे आणि तिच्यावरच अवलंबून होता. मेन्टेनन्स आणि फायनॅशिअल कंट्रोलही रियाकडेच होता.

सुशांतची ट्रिटमेंट सुरु होती, त्यावेळी काही दिवसांसाठी सुशांत रियाच्या घरी राहिला होता. रियाच घरासंदर्भातील सर्व निर्णय घेत होती, असंही नीरजने यावेळी बोलताना सांगतिलं. तसेच यापूर्वी रियाने काही नोकरांना कामावरून काढून टाकलं होतं. युरोप टूरवरून परतल्यानंतर सुशांतची तब्येत बिघडली होती. नीरजला आणि घरातील इतर स्टाफला सुशांतच्या डिप्रेशनबाबत काहीच माहिती नव्हती. रिया सुशांतवर उपचार करत होती. तसेच त्याची औषधंही तिच देत असे, असंही नीरजने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
ABP C-Voter Survey : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Navneet Rana On Modi Statment : माझा व्हिडिओ एडीट करून विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू- राणाVaibhav Khedekar : मनसे संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं काम कसं करायचं, वैभव खेडेकर यांचा सवालAyodhya Ram Navami : रामनवमीच्या पूर्वसंध्येला अयोध्यानगरी सजली, जगभरातून रामभक्त अयोध्येतTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 16 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
ABP C-Voter Survey : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
ABP Majha C voter opinion poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
Embed widget