(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Veer Zara rerelease: 20 वर्षानंतर यशराज फिल्म्सच्या वीर-झाराचा डंका परदेशात! 600 हून अधिक स्क्रीनवर होणार रि-रिलीज
जवळपास दोन दशकांहूनही अधिक काळ भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा यश चोप्राचा वीर-झारा हा चित्रपट आजही पाहणाऱ्याला खीळवून ठेवतो.
Veer Zara Rerelease: यश चोप्राचा आयकॉनिक चित्रपट वीर-झारा या चित्रपटाचा भारतभर मोठा फॅन बेस आहे. अभिनेता शाहरुख खान, प्रीती झिंटा, आणि राणी मुखर्जी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट त्याचा 20व्या वर्धापनानंतर पुन्हा एकदा रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. परदेशातील 600 हून अधिक स्क्रीनवर हा चित्रपट पुनर प्रदर्शित होणार आहे. शिवाय 'आ गये है कहा' हे या चित्रपटात हटवलं गेलेलं गाणं आता पुन्हा एकदा मोठा पडद्यावर दिसणार आहे.
वीर-झारा हा चित्रपट पहिल्यांदाच सौदी अरेबिया, कतार आणि ओमन या देशांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली असून यशराज फिल्मच्या निर्मात्यांनी याचे एक पोस्टर हे प्रसिद्ध केले आहे. आत्तापर्यंतच्या परदेशी बॉलीवूड चित्रपटांच्या रिलीज मधला हा सर्वात मोठा चित्रपट ठरेल असे सांगितले जात आहे.
20 वर्षांनी जगभरातील 600 स्क्रीनवर
जवळपास दोन दशकांहूनही अधिक काळ भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा यश चोप्राचा वीर-झारा हा चित्रपट आजही पाहणाऱ्याला खीळवून ठेवतो. भारत पाकिस्तानमधील सीमेपलीकडचा प्रेम दाखवणारी या सिनेमाची गोष्ट आतापर्यंतच्या प्रतिष्ठित भारतीय सिनेमांपैकी एक समजली जाते. 12 नोव्हेंबर 2004 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता 20 वर्षांनी जगभरातील 600 स्क्रीन स्वर पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातील गाण्यांचा ही वेगळाच फॅन बेस
वीर-झारा या चित्रपटातील गाण्यांचा वेगळा फॅन बेस भारतभर किंबहुना जगभरात आहे. यातील तेरे लिये मे यहा हू दो पल आया तेरे दर पर दिवाना आणि ऐसा देश है मेरा ही गाणी आजही भारतीय प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालतात. जावेद अख्तर यांचे लिखाण, लता मंगेशकर यांचा आवाज, जगजीत सिंह, उदित नारायण, सोनू निगम, गुरुदास मान, या दिग्गजांनी गायलेली ही गाणी पुन्हा एकदा परदेशात मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. विशेष म्हणजे आ गये है कहा हे मूळ चित्रपटात नसलेलं गाणंही आता रिलीज होणाऱ्या वीर-झारामध्ये टाकण्यात आलं आहे.
कोणत्या देशात होणारा प्रदर्शित?
यश चोप्राचा वीर-झारा हा चित्रपट यंदा पहिल्यांदाच सौदी अरेबिया कथा आणि ओमान येथे रिलीज होणार आहे. तर इतर ठिकाणी तो रि -रिलीज होणार आहे. वीर-झारा यूएसए, कॅनडा, युएइ, सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन, कुवेत, युके, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर यासारख्या जागतिक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा रिलीज होणार आहे.