Telly Masala : अक्षया-हार्दिकची पहिली मंगळागौर थाटामाटत पार ते मनोरंजनविश्वात रक्षाबंधनाचा उत्साह; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 30 Aug 2023 04:41 PM
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला संजय दत्तनं बहिणींसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'प्रिया आणि अंजू...'
संजय दत्तने (Sanjay Dutt) त्याच्या दोन्ही बहिणींसोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं खास कॅप्शन दिलं आहे. Read More
Telly Masala : अक्षया-हार्दिकची पहिली मंगळागौर थाटामाटत पार ते मनोरंजनविश्वात रक्षाबंधनाचा उत्साह; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Vicky Kaushal Song Kanhaiya Twitter Pe Aaja: विकी कौशलचं 'कन्हैया ट्विटर पे आजा' गाणं ऐकल्यानंतर भडकले नेटकरी; म्हणाले...
अनेक नेटकऱ्यांनी  'कन्हैया ट्विटर पे आजा' (Kanhaiya Twitter Pe Aaja) या गाण्याला ट्रोल केलं आहे. Read More
Rakshabandhan 2023 : देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह; तुमच्या लाडक्या मालिकांमध्येही रंगणार 'रक्षाबंधन विशेष' भाग
Marathi Serials : मराठी मालिकांमध्ये 'रक्षाबंधन विशेष' भाग रंगणार आहे. Read More
Shiv Thakare : ताई, आता आपले दिवस आलेत, ओवळणीला 1 रुपया देणाऱ्या शिव ठाकरेकडून बहिणीला मोठं गिफ्ट
Shiv Thakare : शिव ठाकरेने त्याच्या बहिणीला रक्षाबंधनाची (Rakshabandhan 2023) खास भेट दिली आहे. Read More
Abhijit Kelkar: अभिनेता अभिजीत केळकरनं भाजपमध्ये केला प्रवेश; म्हणाला,'किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची?'
अभिनेता अभिजीत केळकरनं (Abhijit Kelkar)  भाजपमध्ये (BJP)  केला प्रवेश आहे. Read More
Shah Rukh Khan : जय माता दी! 'Jawan'च्या रिलीजआधी शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनाला; चाहते म्हणाले,"एक ही दिल है,कितनी बार जीतोगे"
Shah Rukh Khan Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने 'जवान' (Jawan) सिनेमाच्या रिलीजआधी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आहे. Read More
Raksha Bandhan 2023: बंधन ते सरबजीत; भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित असणारे 'हे' चित्रपट नक्की बघा
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला तुम्ही आपल्या भाऊ-बहिणींसोबत हे चित्रपट पाहू शकता. Read More
Khushbu-Titeeksha Tawade : खुशबू आणि तितिक्षाने एकमेकींना बांधली राखी; तावडे बहिणींचं अनोखं रक्षाबंधन!
Khushbu-Titeeksha Tawade : खुशबू आणि तितिक्षाने एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं आहे. Read More
Shiv Thakare : गणपती बाप्पा मोरया! शिवचा एनर्जी सोर्स आहे बाप्पा; म्हणाला,"गणरायाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही"
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा बाप्पा' या सेगमेंटमध्ये जाणून घ्या शिवचं (Shiv Thakare) आणि बाप्पाचं नातं कसं आहे... Read More
Khupte Tithe Gupte : ‘खुपते तिथे गुप्ते'मध्ये चंद्रमुखी लावणार हजेरी ; अमृता खानविलकर देणार अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना बिनधास्त आणि स्पष्ट उत्तरं
चंद्रमुखी  अशी ओळख असणारी अभिनेत्री  अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही   ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहे. Read More
Allu Arjun Pushpa 2:   लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन; अल्लू अर्जुननं शेअर केला 'पुष्पा: द राइज'च्या सेटवरील खास व्हिडीओ
Allu Arjun Pushpa 2: नुकताच अल्लू अर्जुननं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अल्लू अर्जुननं 'पुष्पा: द रूल' या चित्रपटाच्या सेटची झलक दाखवली. Read More
Akshaya Deodhar Hardeek Joshi : हातावर मेहंदी, बनारसी साडी अन् भव्य सजावट; अक्षया-हार्दिकची थाटामाटात साजरी झाली पहिली मंगळागौर
Akshaya Deodhar Hardeek Joshi : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची पहिला मंगळागौर खूपच थाटामाटात साजरी झाली आहे. Read More
Miss Diva Universe 2023 Shweta Sharda: वय फक्त 22 वर्ष... चंदीगढच्या श्वेता शारदानं पटकावला 'मिस दिवा युनिव्हर्स'चा खिताब
श्वेता शारदाने (Shweta Sharda) मिस दिवा युनिव्हर्स 2023 (Miss Diva Universe 2023) चे विजेतेपद पटकावले आहे. Read More
Sunny Deol : अभिनेता सनी देओलचं विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन! 'गदर 2'च्या निर्मात्यांची प्रेक्षकांसाठी बंपर ऑफर; एका तिकीटावर दोन मोफत
Sunny Deol : अभिनेता सनी देओलने यंदाचं रक्षाबंधन विद्यार्थांसोबत साजरं केलं आहे. Read More
Gashmeer Mahajani : राजासारखे राहिले, स्वच्छंदी जगले अन् स्वतःच्याच टर्मवर गेले; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरने सांगितली नाण्याची तिसरी बाजू
Gashmeer Mahajani : रविंद्र महाजनींच्या (Ravindra Mahajani) निधनानंतर त्यांच्या मुलाला गश्मीरला प्रचंड ट्रोल करण्यात आले. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Pankaj Tripathi Father Passed Away : 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी (Pandit Banaras Tiwari) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.पंकज त्रिपाठी आणि त्याच्या वडिलांचं नातं खूपच घट्ट होतं. वडिलांच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. करिअरसाठी पंकज मुंबईत असले तरी त्यांचं मूळ गाव बिहार आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी बिहारमधील गोपालगंज येथे अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाने ते खूप दु:खी झाले आहेत.


Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट


Sunny Deol Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. 


Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"


Salman Khan New Bald Look : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील (Salman Khan Bald Look) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या (Tere Naam 2) तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.