Shiv Thakare : ताई, आता आपले दिवस आलेत, ओवाळणीला 1 रुपया देणाऱ्या शिव ठाकरेकडून बहिणीला मोठं गिफ्ट
Shiv Thakare : शिव ठाकरेने त्याच्या बहिणीला रक्षाबंधनाची (Rakshabandhan 2023) खास भेट दिली आहे.
![Shiv Thakare : ताई, आता आपले दिवस आलेत, ओवाळणीला 1 रुपया देणाऱ्या शिव ठाकरेकडून बहिणीला मोठं गिफ्ट Shiv Thakare Rakshabandhan 2023 Shiv Thakare gift iphone 14 pro to sister as Rakshabandhan gift know details entertainment Shiv Thakare : ताई, आता आपले दिवस आलेत, ओवाळणीला 1 रुपया देणाऱ्या शिव ठाकरेकडून बहिणीला मोठं गिफ्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/30/45919eb472a38be3265fdbf825fd4c8d1693386830028254_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shiv Thakare Rakshabandhan 2023 : देशभरात रक्षाबंधनाचा (Rakshabandhan 2023) उत्साह आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीदेखील रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे. 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेने (Shiv Thakare) त्याच्या बहिणीला दिलेल्या खास गिफ्टने मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे आता प्रत्येक बहिणीला 'भाऊ असावा तर असा' असं वाटत आहे.
शिवने लाडक्या बहिणीला काय ओवाळणी दिली?
मेहनतीच्या जोरावर 'आपला माणूस' शिव ठाकरेला चांगलच यश मिळालं आहे. या यशात त्याच्या आई-वडिलांसोबत त्याच्या बहिणाचाही मोठा वाटा आहे. ताई, आता आपले दिवस आलेत, असं म्हणत शिवने बहिणीला मोठं गिफ्ट दिलं आहे. शिवच्या बहिणीचं नाव मनिषा आहे. ओवाळणीला एक रुपया देणाऱ्या शिव ठाकरेने बहिणीला 'आयफोन प्रो 14' (Iphone Pro 14) भेट म्हणून दिला आहे.
इन्संस्ट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरे म्हणाला,"मी कमवत नव्हतो तेव्हा वडिलांकडून 100 रुपये ताईला ओवाळणी द्यायला 100 रुपये घेत असे. पण ताईला ओवाळणीत मात्र फक्त एक रुपया देत असे. वडिलांनी दिलेले 100 रुपये मी माझ्याकडेच ठेवायचो. पण यंदाचं रक्षाबंधन आमच्यासाठी खूपच खास आहे. मी बहिणीला आयफोन प्रोची भेट दिली आहे. ताईला मी आयफोनची भेट दिली आहे यावर तिचा विश्वासच बसत नाही आहे. आता माझे दिवस आले आहेत".
View this post on Instagram
शिव ठाकरेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत आहे. एक बहिण म्हणून शिवच्या बहिणाला त्याचा अभिमान वाटतो. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिवच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना शिवची बहिण म्हणाली,"शिवला लहानपणीपासूनच मजा करायला खूप आवडतं. तो प्रचंड खोड्या करायचा. तो खोडकर असला तरी तो खूप प्रामाणिक आहे".
शिवची बहिण मनिषा पुढे म्हणाली,"शिव त्याच्या त्वचेची खूप काळजी घेतो. धुळवडीला शिवचे मित्र त्याला रंग लावायला घरी यायचे. त्यावेळी शिव मागच्या दारातून बाहेर पडत असे आणि आख्या कॉलणीत मित्रांना फिरवायचा. सकाळी दहा वाजता घराबाहेर पडलेला शिव संध्याकाळी चार-पाच वाजले तरी मित्रांना भेटत नसे".
संबंधित बातम्या
Shiv Thakare : गणपती बाप्पा मोरया! शिवचा एनर्जी सोर्स आहे बाप्पा; म्हणाला,"गणरायाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)