Gashmeer Mahajani : राजासारखे राहिले, स्वच्छंदी जगले अन् स्वतःच्याच टर्मवर गेले; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरने सांगितली नाण्याची तिसरी बाजू
Gashmeer Mahajani : रविंद्र महाजनींच्या (Ravindra Mahajani) निधनानंतर त्यांच्या मुलाला गश्मीरला प्रचंड ट्रोल करण्यात आले.
Gashmeer Mahajani Relation With Father Ravindra Mahajani : अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला म्हणजेच अभिनेता गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) इंडस्ट्रीतील काही मंडळींसह नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं. आता नुकत्याच एका मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. गश्मीर म्हणतो,"माझे वडील अर्थात रविंद्र महाजनी राजासारखे राहिले, स्वत:च्या टर्मवर राहिले आणि स्वत:च्या टर्मवर गेल".
सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Saumitra Pote) यांच्या 'मित्र म्हणे' (Mitra Mhane) या रविंद्र महाजनींच्या निधनानंतर ट्रोल करण्यांबद्दल गश्मीर म्हणाला,"ट्रोलर्सला उत्तर देण्याची मला गरज पडली नाही. कारण ज्या सामान्य लोकांनी माझा प्रवास पाहिला आहे त्यांनीच या टोल करणाऱ्या लोकांना उत्तर दिलं. ट्रोल करणाऱ्यांचा मला त्रास होत नाही. माझ्या इंडस्ट्रीतील काही लोकांनी याप्रकरणावर भाष्य केलं. म्हातारपणात कसं एकटं पडतो, मराठी कलाकारांकडे पैसे नसतात, आता मराठी कलाकारांनी स्वत:च्या म्हातारपणाची सोय केली पाहिजे असं ही इंडस्ट्रीतील मंडळी म्हणाली. हे सर्व ऐकून पित्त खवळायला लागलं. मला वाटलं की, तुम्ही तरी असं काही बोलू नका. तुम्ही जे बोलताय ते माझ्या वडिलांना लागू होत नाही. 15 मिनिटांच्या फेमसाठी तुम्ही काहीही बोलणार. ते राजासारखे राहिले, स्वत:च्या टर्मवर राहिले आणि स्वत:च्या टर्मवर गेले".
रविंद्र महाजनी यांचा मृत्यू कशामुळे झाला? (Ravindra Mahajani Death Reason)
रविंद्र महाजनी यांचा मृतदेह 15 जुलैला पुण्यातील एका अपार्टमेंटमध्ये आढळला. त्यांच्या निधनाबद्दल बोलताना गश्मीर (Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani Death) म्हणाला,"त्यांचं निधन हे कार्डियाक अरेस्टने झालं..डॉक्टर म्हणाले की, तुम्ही तिथे असता तरी काहीच करू शकले नसता. यातना नसलेला मृत्यू त्यांना मिळाला आहे".
वडिलांबद्दल बोलताना गश्मीर म्हणतो,"बाबा त्यांच्या मर्जीने त्यांना वाटेल तेव्हा आमच्या घरी राहायला यायचे. त्यानंतर त्यांना वाटायचं आता मला स्वच्छंदी जगायचं आहे तेव्हा ते निघून जायचे आणि एकटे जगायचे. आर्थिकदृष्ट्या ते सबळ होते. पण केअरटेकर त्यांना आवडत नसे. स्वत:चं काम स्वत: करायला त्यांना आवडायचं. कोणी मदत केलेली त्यांना नामंजूर होती आणि हीच त्यांच्या जगण्याची पद्धत होती. त्यांच्या या निर्णयाचा आम्ही आदर केला".
रविंद्र महाजनींनी गश्मीरला केलेलं ब्लॉक
गश्मीर म्हणाला,"20-22 वर्षांपूर्वी ते वेगळे राहायला गेले. पण माझा छोटा मुलगा मोठा होऊ लागला तेव्हा मला वाटायचं की त्याला त्याच्या आजोबांचा सहवास लाभायला हवा. त्यामुळे मी त्यांना त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाठवत असे. सुरुवातीला त्यांनी हे पाहिलं पण नंतर त्यांनी मला ब्लॉक केलं. पुढे आईचा नंबर आणि माझ्या पत्नीलाही त्यांनी ब्लॉक केलं. नातवाला पाहून ते हळवे व्हायचे आणि आपण पुन्हा संसारात अडकू याची त्यांना भीती वाटत असावी म्हणून त्यांनी ब्लॉक केलं, असा माझा अंदाज आहे".
गश्मीर पुढे म्हणाला,"रविंद्र महाजनींच्या निधनानंतर ते हलाखीच्या परिस्थीतीत होते. अडगळीच्या खोलीत ते मृतावस्थेत आढळून आले असे म्हटले गेले. पण खरंतर ते खूप सुखात, आलिशान पद्धतीत स्वच्छंदी आयु्ष्य जगले".
संबंधित बातम्या