(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raksha Bandhan 2023: बंधन ते सरबजीत; भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित असणारे 'हे' चित्रपट नक्की बघा
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला तुम्ही आपल्या भाऊ-बहिणींसोबत हे चित्रपट पाहू शकता.
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) हा सण बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. आज बहिण ही भावाला राखी बांधते तर भाऊ हा बहिणीला खास गिफ्ट देतो. रक्षाबंधन हा सण आणखी खास करण्यासाठी तुम्ही आपल्या भाऊ-बहिणींसोबत हे चित्रपट पाहू शकता.
रक्षाबंधन (Rakshabandhan)
गेल्या रिलीज झालेल्या रक्षाबंधन या चित्रपटात अक्षय कुमारनं प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटाची कथा एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणी यांच्यावर आधारित आहे. चित्रपटात भाऊ-बहिणीचं नातं खूप छान पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
View this post on Instagram
बंधन (Bandhan)
1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंधन या चित्रपटात सलमान खान आणि जॅकी श्रॉफ यांनी प्रमुख भूमिका साकारली होची. या चित्रपटात सलमान खानने 'राजू' ही व्यक्तिरेखा साकारली आहे जो बहिणीच्या लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी जातो. अश्विनी भावेने या चित्रपटात सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात भाऊ आणि बहिण यांच्यामधील बाँडिंग दाखवण्यात आलं आहे.
हम साथ साथ हैं (Hum Saath - Saath Hain)
हम साथ साथ हैं हा चित्रपट 1999 मध्ये रिलीज झाला. अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात.. या चित्रपटात सलमान, सैफ, सोनाली, मोहनीश बहल, करिश्मा आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात भाऊ-बहिणीच्या नात्यामध्ये असणारे प्रेम दाखवण्यात आले आहे.
जोश (Josh)
अभिनेका शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा 2000 साली प्रदर्शित झालेला जोश हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटात शाहरुख आणि ऐश्वर्या भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दाखवण्यात आले असून, त्यांची बॉन्डिंग पाहण्यासारखी आहे.
सरबजीत (Sarabjit)
2016 मध्ये प्रदर्शित झालेला सरबजीत हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय यांनी भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली होती. एका बहिणीने आपल्या भावासाठी केलेला संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट आज पाहू शकता.
संबंधित बातम्या