(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khupte Tithe Gupte : ‘खुपते तिथे गुप्ते'मध्ये चंद्रमुखी लावणार हजेरी ; अमृता खानविलकर देणार अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना बिनधास्त आणि स्पष्ट उत्तरं
चंद्रमुखी अशी ओळख असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहे.
Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये चंद्रमुखी अशी ओळख असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही हजेरी लावणार आहे. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अमृता ही अवधूत गुप्तेनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना दिसत आहे.
‘खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अमृता ही तिच्या चंद्रमुखी या चित्रपटामधील चंद्रा या गाण्यावर डान्स करत आहे. त्यानंतर अवधूत गुप्ते तिला प्रसाद ओक फोटो दाखवतो. तो फोटो पाहिल्यानंतर अमृता म्हणते, 'मला आजही असं वाटतं की दौलत ही भूमिका त्यानेच साकारायला पाहिजे होती.'
पुढे प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते म्हणतो, 'पण तुला असं नाही वाटत का की खरंच ज्यांनी देशमाने ही भूमिका साकारली त्यांना वाईट वाटेल?' अवधूत गुप्ते यांच्या या प्रश्नाचं आता अमृता काय उत्तर देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 'धारदार प्रश्नांना बिनधास्त आणि स्पष्ट उत्तरं द्यायला येतेय अभिनेत्री अमृता खानविलकर..!' असं कॅप्शन सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोला देण्यात आलं आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता अमृता खानविलकर खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार असल्यानं प्रेक्षक या एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 3 सप्टेंबर रोजी हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
साडे माडे तीन,चोरीचा मामला,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये अमृतानं काम केलं. तसेच तिनं मलंग आणि राझी या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. अमृताच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामुळे अमृताला विशेष ओळख मिळाली.
संबंधित बातम्या
Khupte Tithe Gupte : "मी राहुल गांधींची भूमिका केली तर..."; सुबोध भावेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष