सोलापूर: बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्या (Walmik Karad) अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं समोर येत आहे. वाल्मिक कराडसह (Walmik Karad) त्याच्या दोन्ही पत्नीच्या नावे मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता सोलापुरात देखील वाल्मिक कराडची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडची (Walmik Karad) पहिल्या पत्नीच्या नावे पुण्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे, तर कराडच्या दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. बार्शीत दुसऱ्या पत्नीच्या नावे जवळपास 35 एकर शेती असल्याची माहिती आहे. तर या शेतात काम करणाऱ्या सालगड्याला गेल्या काही महिन्यांपासून पगार दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.
ज्योती मंगल जाधवच्या नावावर 35 एकर जमीन
वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे बार्शीतल्या शेतातल्या सलगड्याला मागील तीन चार महिन्यापासून पगार देखील मिळाला नाही अशी माहिती समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे माने या कुटुंबाने गेल्या तीन महिन्यापासून मजुरी न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे. बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मिक कराडची दुसरी बायको ज्योती मंगल जाधवच्या नावावर 35 एकर जमीन असल्याची माहिती समोर आली होती. सात महिन्यापूर्वी या शेतावर माणिक शिंदे-माने यांचे कुटुंब हे सालगडी म्हणून काम पाहतात.
बार्शीतील शेती कोण पाहतं?
मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यापासून ज्योती मंगल जाधवनी कोणताही मोबदला दिला नसल्याची सालगड्याची माहिती आहे. दरम्यान वाल्मिक कराड संदर्भात या सालगडयांना कोणतीही माहिती नाही. ज्योती जाधवचा भाऊ जाधव मास्तर हाच या बार्शीतील शेती संदर्भात काम पाहायचा अशी माहिती आहे. मात्र, मागील तीन महिन्यापासून ज्योती जाधव किंवा तीचा भाऊ कोणीही या शेतीकडे फिरकलं नसल्याची माहिती आहे. सात महिन्यांपूर्वी जाधव मास्तर याने शिंदे माने कुटुंबाला सालगडी म्हणून ठेवलं होतं, सुरुवातीच्या दोन महिने व्यवस्थित पगार दिला. मागच्या 4 महिन्यापासून कोणताही पगार मिळाला नसल्याचं या कुटुंबाने सांगितलं आहे. दरम्यान जवळपास 35 एकर क्षेत्रात मोसंबी, लिंबू, नारळ, हरबरा इत्यादी पिकांची लागवड करण्यात आलीआ आहे.
बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने 4 जमिनीचे सातबारे असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते. या संदर्भात एबीपी माझाने अधिक माहिती घेतली असता ही तीच ज्योती मंगल जाधव आहे. जिच्या नावावर पुण्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्यात आली आहे. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
कोणत्या ठिकाणी मालमत्ता?
1) पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021 मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला.
2) पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे.
3) पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा आहे.
4) बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
5) ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसर मधील अॅमेनोरा पार्क टाऊनशीप मधे Sector R 21, Tower 33, floor 17, फ्लॅट 07 हा फ्लॅट Sector R 21 , Tower 33 , फ्लॅट 08 हा आणखी एक फ्लॅट Gera Greensville, फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. या फ्लॅटची किंमत दीड ते तीन कोटींच्या आसपास आहे.