(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khushbu-Titeeksha Tawade : खुशबू आणि तितिक्षाने एकमेकींना बांधली राखी; तावडे बहिणींचं अनोखं रक्षाबंधन!
Khushbu-Titeeksha Tawade : खुशबू आणि तितिक्षाने एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं आहे.
Khushbu Tawade Titeeksha Tawade Rakshabandhan 2023 : रक्षाबंधन (Rakshabandhan 2023) म्हणजे भावंडांमधील अनोखे बंधन अगदी जिव्हाळ्याचा सण या सणाला बहीण भाऊ एकमेकांना राखी बांधतात व छानशी भेटवस्तू घेतात. प्रत्येकजण हा सण साजरा करतो. मग त्याला कलाकारही अपवाद कसे राहतील. अभिनेत्री खुशबू तावडे (Khushbu Tawade) आणि तितिक्षा तावडे (Titeeksha Tawade) यांनीदेखील अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं आहे.
सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारमंडळीही अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करत असतात. कुणी एखादी पोस्ट लिहितो, कुणी फोटो शेयर करतो तर कुणी त्यांच्या घरगुती सोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असतात. 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडेने (Khushbu Tawade) आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Saatvya Mulichi Saatvi Mulgi) फेम तितिक्षा तावडे (Titeeksha Tawade) या दोन सख्ख्या बहिणी आहेत.
View this post on Instagram
रक्षाबंधनाचा दिवस आमच्यासाठी जिव्हाळ्याचा : खुशबू तावडे
रक्षाबंधनाबद्दल बोलताना खुशबू म्हणाली,"रक्षाबंधनाचा दिवस आमच्यासाठी जिव्हाळ्याचा राहिला आहे. कारण घरात नेहमीच खेळीमेळीचं वातावरण राहिलं आहे. दरवर्षी सकाळी पहिली राखी देवाला , दुसरी राखी आमच्या बाबांना आणि तिसरी राखी मी आणि तितिक्षा एकमेकींना बांधायचो".
खुशबू पुढे म्हणाली,"लहानपणी जेव्हा कळतं वय नव्हतं तेव्हा फक्त भेटवस्तूंसाठी राखी बांधायचो. पण जेव्हा मोठे झालो तेव्हा कळायला लागलं तेव्हापासून बहिणीचं हे बंधन आणि नातं जोपासण्यासाठी आम्ही हा सण साजरा करायचं ठरवले. यंदाचं रक्षाबंधन आमच्यासाठी खास आहे कारण आम्ही दोघी बहिणी दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहोत व ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझी नवीन मालिका जी दोन बहिणींवर आधारित आहे व याच मालिकेच्या प्रोमोशन निम्मिताने आम्ही दोघीनी पूर्ण महिना साजरा केला आहे.एकमेकींना भेट वस्तू पण दिल्या आहेत.
प्रत्येक बहिणींनी आपली नाती जपावी
यंदाही कामत कितीही व्यस्त असलो तरीही एकमेकींसाठी नक्की वेळ काढून भेटणार आहोत व हा दिवस साजरा करणार आहोत. प्रत्येक बहिणींनी आपली नाती जपावी हा संदेश तर आम्ही आमच्या मालिकेतून देतच आहोत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असं खुशबू म्हणाली.
संबंधित बातम्या