Rohit Sharma : पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. भारतीय संघ निवडण्यासाठी रोहित आणि आगरकर यांच्यात दीर्घ चर्चा झाल्याने पत्रकार परिषद बराच वेळ लांबणीवर पडली. रोहित मीडियाला संबोधित करण्यासाठी खुर्चीवर बसला तेव्हा अजित आगरकर बोलत होते. माईकचा आवाज सुरू असल्याचे रोहितला कळले नाही. यावेळी रोहित बीसीसीआयच्या निर्णयाबद्दल आगरकरशी बोलताना दिसला. ज्यामध्ये बोर्डाने खेळाडूंच्या कुटुंबीयांचा परदेशी दौऱ्यांवर सहभाग मर्यादित केला होता.
'मला सेक्रेटरीशी बोलावे लागेल'
रोहित आगरकरांशी बोलताना ऐकण्यात आलं, 'आता मला कौटुंबिक नियमांवर चर्चा करण्यासाठी सचिवांसोबत बसावे लागेल. सर्व खेळाडू मला कॉल करत आहेत. विशेष म्हणजे असे सांगितल्यानंतर रोहित थांबला आणि पत्रकारांशी बोलू लागला. यावर कोणतीही प्रतिक्रिया येण्यापूर्वीच आगरकर यांनी पत्रकार परिषद सुरू करून चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली.
ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक?
रोहितच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले आहे की ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक नाही. अलीकडेच, ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर, बीसीसीआयने कठोर निर्णय घेतले होते ज्यात खेळाडूंना 45 दिवसांपेक्षा जास्त परदेश दौऱ्यांवर फक्त दोन आठवडे त्यांच्या कुटुंबियांसोबत ठेवण्याची परवानगी होती. सहसा खेळाडू त्यांच्या पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसोबत दौऱ्यावर जातात, परंतु बीसीसीआयने यावर कठोर भूमिका घेतली होती.
बीसीसीआयने 10 कलमी धोरण तयार केले
याशिवाय बीसीसीआयने सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केले होते आणि परदेश दौऱ्यांवर वैयक्तिक कर्मचाऱ्यांवर बंदी घातली होती.याशिवाय मालिकेदरम्यान खेळाडूंना वैयक्तिक जाहिराती शूट करता येणार नाहीत.10 कलमी धोरणाचे पालन करणे बंधनकारक असेल. तसे न झाल्यास बीसीसीआय कारवाई करेल.यापुढे, दौऱ्यात खेळाडूंना स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि सामना लवकर संपल्यास लवकर बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
संघात शिस्त आणि एकात्मता वाढवण्यासाठी हे धोरण लागू करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका पराभव आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर व्हाईटवॉश झाल्यानंतर संघात दुफळी निर्माण झाल्याच्या आणि खेळाडू एकत्र बसत नसल्याच्या बातम्या आल्या. अशा स्थितीत बीसीसीआयने हे धोरण राबविणे आवश्यक मानले जेणेकरुन खेळाडूंची कामगिरी आणि वचनबद्धता सुधारता येईल.
गौतम गंभीर यांना स्टार कल्चर संपवायचे आहे
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सांगण्यावरून बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. स्टार कल्चर संपवण्याची मागणी प्रशिक्षकांनी केली आहे. संघाच्या नुकत्याच झालेल्या खराब कामगिरीच्या आढावा बैठकीत गंभीर यांनी या मंजुरीची मागणी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या