![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Telly Masala : अक्षया-हार्दिकची पहिली मंगळागौर थाटामाटत पार ते मनोरंजनविश्वात रक्षाबंधनाचा उत्साह; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
![Telly Masala : अक्षया-हार्दिकची पहिली मंगळागौर थाटामाटत पार ते मनोरंजनविश्वात रक्षाबंधनाचा उत्साह; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... Telly Masala : अक्षया-हार्दिकची पहिली मंगळागौर थाटामाटत पार ते मनोरंजनविश्वात रक्षाबंधनाचा उत्साह; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/78c8a458e5b1fe4dc888dad70b53579c1692675208270254_original.jpeg)
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pankaj Tripathi Father Passed Away : 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी (Pandit Banaras Tiwari) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.पंकज त्रिपाठी आणि त्याच्या वडिलांचं नातं खूपच घट्ट होतं. वडिलांच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. करिअरसाठी पंकज मुंबईत असले तरी त्यांचं मूळ गाव बिहार आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी बिहारमधील गोपालगंज येथे अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाने ते खूप दु:खी झाले आहेत.
Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट
Sunny Deol Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"
Salman Khan New Bald Look : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील (Salman Khan Bald Look) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या (Tere Naam 2) तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत.
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला संजय दत्तनं बहिणींसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'प्रिया आणि अंजू...'
Telly Masala : अक्षया-हार्दिकची पहिली मंगळागौर थाटामाटत पार ते मनोरंजनविश्वात रक्षाबंधनाचा उत्साह; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Vicky Kaushal Song Kanhaiya Twitter Pe Aaja: विकी कौशलचं 'कन्हैया ट्विटर पे आजा' गाणं ऐकल्यानंतर भडकले नेटकरी; म्हणाले...
Rakshabandhan 2023 : देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह; तुमच्या लाडक्या मालिकांमध्येही रंगणार 'रक्षाबंधन विशेष' भाग
Shiv Thakare : ताई, आता आपले दिवस आलेत, ओवळणीला 1 रुपया देणाऱ्या शिव ठाकरेकडून बहिणीला मोठं गिफ्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)