एक्स्प्लोर

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा थिएटरमध्ये विनयभंग

मराठी सिनेसृष्टीचे दिवंगत सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली.

मुंबई : मराठी सिनेसृष्टीचे दिवंगत सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने थिएटरमध्ये विनयभंग केल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. मीरा रोडमधील थिएटरमध्ये हा प्रकार घडला. प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये होत्या. सुरक्षरक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. या प्रकरणी बोरीवलीतील 43 वर्षीय बिझनेसमन सुनीला जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. काशीमिरा पोलिस्टेशनमध्ये आरोपीविरोधात भारतीय दंडविधान कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. प्रिया बेर्डे यांच्या तक्रारीनुसार, "आरोपी आणि त्याच्यासोबत असलेले तीन जण मद्यधुंद अवस्थेत होते. संध्याकाळी 5.30 वाजताचा शो सुरु झाल्यानंतर आरोपींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर थिएटरमधील इतर प्रेक्षकांनी त्यांना मज्जाव केला असता ते तिघेही थिएटरमधून बाहेर गेले. पण काही मिनिटांनी कोणीतरी आपल्या कमरेला स्पर्श करत असल्याचं जाणवलं. गोंधळ घालणारा व्यक्तीच हे कृत्य करत असल्याचं लक्षात आल्यानंतर मी त्याच्या थोबाडीत लगावली आणि आरडाओरडा केला. तो दारुच्या नशेत होता. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मला धक्का देऊन त्याने पळ काढला. या सगळ्या प्रकारामुळे माझ्या मुलीला धक्का बसला. यानंतर आम्ही मॉलच्या सुरक्षारक्षाकडे जाऊन संबंधित आरोपीची माहिती दिली. त्याला मॉलबाहेर गाडीची वाट पाहत असलेल्या आरोपीला सुरक्षारक्षकांनी पाहिलं. पण आम्हाला पाहिल्यानंतर तो मॉलच्या आत पळाला. मात्र दुसऱ्या मजल्यावर सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं." "काशीमिरा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपी पोलिस कोठडीत असून चौकशी सुरु आहे," असं ठाणे शहरचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
Embed widget