एक्स्प्लोर

Drishyam 2: अजय देवगणच्या दृश्यम-2 ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; नवव्या दिवशी केली बंपर कमाई

 दृष्यम-2 (Drishyam 2) हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. अजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे.

Drishyam 2: फिल्म क्रिटीक्स तसेच प्रेक्षक हे सध्या अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2  (Drishyam 2) या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाचा क्लायमॅक्स तसेच चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, कथानक या गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाच्या या कथेमध्ये सस्पेन्स आणि थ्रिल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. अजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. आता चित्रपट रिलीज होऊन नऊ दिवस झाले आहेत. तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

दृश्यम-2 या चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात धमाकेदार एन्ट्री केली.  नवव्या दिवशी म्हणजेच शनिवार (26 नोव्हेंबर) या चित्रपटानं जवळपास 13.50-14 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं एकूण 140 कोटींची कमाई केली आहे. 

दृश्यम-2 या चित्रपटाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.  'दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केले होते. 

दृश्यम-2 च्या कलाकारांचे मानधन: 

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अजय देवगननं या चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच अभिनेत्री तब्बूनं या चित्रपटासाठी 3.5 कोटी  फी घेतली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरननं  दृश्यम-2 मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिनं 2 कोटी एवढं मानधन घेतलं आहे. 

चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज

दृश्यम-2  या सिनेमाचे डिजिटल राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत. त्यामुळे आता प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षक हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे, असं म्हटलं जात आहे. 

अजयचा आगामी चित्रपट 

अजयचा भोला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  'भोला' हा दाक्षिणात्य सिनेमा 'कॅथी'चा हिंदी रिमेक आहे. तसेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजय देवगण सांभाळत आहे.  अजय देवगण, टी-सीरिज फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट आणि ड्रीम वॉरिअर पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Drishyam 2 : अजयच्या 'दृश्यम 2'मध्ये झळकतोय मराठमोळा चेहरा; अभिनेत्याच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget