Dream Girl 2: आयुष्मानच्या ड्रीम गर्ल-2 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; पहिल्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई
जाणून घेऊयात 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन....
Dream Girl 2 Box Office Collection Day 1: अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) यांचा 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. हा चित्रपट या शुक्रवारी (25 ऑगस्ट) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. जाणून घेऊयात या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन....
तरण आदर्श यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. त्यांच्या ट्वीटनुसार, ड्रीम गर्ल-2 या चित्रपटानं पहिल्या दिवशी 10.69 कोटींची कमाई केली आहे.
सनी देओलच्या गदर 2 चित्रपटाच्या तुफानी कमाई समोर 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटानं पहिल्या दिवशी चांगले कलेक्शन केले आहे, असं म्हटलं जात आहे. आता वीकेंडला हा चित्रपट जास्त कमाई करेल, असा अंदाज देखील लावला जात आहे.
⭐️ #TheKeralaStory
— taran adarsh (@taran_adarsh) August 26, 2023
⭐️ #ZaraHatkeZaraBachke
⭐️ #SatyaPremKiKatha
⭐️ #RockyAurRaniKiiPremKahaani
⭐️ #Gadar2
⭐️ #OMG2
⭐️ Now the enthusiastic start of #DreamGirl2 has helped in the REVIVAL of #Bollywood.#DreamGirl2 starts VERYYY WELL on Day 1… The growth in biz [post 4 pm… pic.twitter.com/WXpydaarVz
ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ड्रीम गर्ल या चित्रपटाची निर्मिती 28 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. या चित्रपटानं जवळपास 200 कोटींची कमाई केली होती. आता ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
ड्रीम गर्ल-2 ची स्टार कास्ट
ड्रीम गर्ल-2 या चित्रपटामध्ये आयुष्मान आणि अनन्यासोबतच परेश रावल, अनु कपूर, राजपाल यादव, असरानी, सीमा पाहवा, विजय राज, मनजोत सिंह, अभिषेक बनर्जी, रंजन राज, मनोज जोशी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
नेटकऱ्यांनी केलं चित्रपटाचं कौतुक
ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करुन आयुष्मानच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. एका ट्विटरवर (X) 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाला त्याला पाच स्टार्स दिले.
इतर महत्वाच्या बातम्या