एक्स्प्लोर
आदित्य ठाकरेंसोबतच्या डिनर डेटबाबत दिशा पाटनी म्हणते...
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या अफेअरमुळे तर कधी सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या अफेअरमुळे तर कधी सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी दिशा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत जुहू येथील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेली होती. त्यानंतर दिशा आदित्यला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
याआधीदेखील दिशा आणि आदित्य एकत्र हॉटेलमध्ये दिसले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दिशा नेहमी तिचा कथित बॉयफ्रेण्ड टायगर श्रॉफसोबत दिसते. परंतु तिला आदित्य ठाकरेंसोबत पाहणे अनेकांच्या पचनी पडले नाही. दोघांना एकत्र पाहून नेटिझन्स 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या कमेंट करुन दिशाला ट्रोल करु लागले.
या सर्व प्रकरणावर दिशाने अखेर मौन सोडले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना दिशाने उलट प्रश्न केला की, "दोन मित्र एकत्र लंच किंवा डिनरसाठी जाऊ शकत नाहीत का? मुलगा किंवा मुलगी या आधारावर मी माझे मित्र निवडत नाही. मी केवळ मुलींशी मैत्री करत नाही. माझ्या मित्रांच्या यादीत खूप मुलं आणि मुली आहेत."
दिशा पाटनीबद्दलच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी हात जोडले!
दिशा एवढ्यावरच थांबली नाही. "ती म्हणाली की, लोक काय म्हणत आहेत? सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. याकडे मी लक्ष देत नाही. माझ्या मनाला जे वाटतं मी तेच करते. लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही."
'या' मतदार संघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार
दोन दिवसांपूर्वी आदित्य आणि दिशा पुन्हा एकदा एकत्र दिसून आले होते. त्यामुळे आता त्यांच्या मैत्रीची चर्चा पुन्हा रंगली आहे. त्यात विशेष भर म्हणजे दोघांचे वाढदिवसही एकाच दिवशी असल्याने आज ते दोघे पुन्हा भेटणार का? एकत्र वाढदिवस सेलिब्रेट करणार का? याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.
आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याचे संजय राऊत यांचे संकेत | ABP Majha
13 जून 1992 ही दिशाची जन्मतारीख आहे. आज तिचा 27 वा वाढदिवस आहे. तर 13 जून 1990 ही आदित्य ठाकरे यांची जन्मतारीख आहे. आज आदित्य यांचा 29 वा वाढदिवस आहे.
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत होर्डींगबाजी, 'महाराष्ट्र वाट पाहतोय'चा संदेश | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
क्राईम
बातम्या
Advertisement