एक्स्प्लोर
#MeToo: सुभाष घईंनी ड्रग आणि दारु पिऊन रेप केला, महिलेचा आरोप
सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अमली पदार्थाचं सेवन करुन आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपानंतर #MeToo वादळ बॉलिवूडमध्ये सर्वाधिक घोंगावताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अमली पदार्थाचं सेवन करुन आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
कॉमेडियन उत्सव चक्रवर्ती यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिमा कुकरेजाने संबंधित महिलेसोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्या महिलेने सुभाष घई यांच्यावर केलेले आरोप महिमा कुकरेजाने शेअर केले आहेत.
"एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी मला दारु प्यायला लावली. त्यानंतर ते मला त्यांच्या कारमधून माझ्या घरी सोडतील असं वाटलं, पण त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर अतिप्रसंग केला. मी विरोधही केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला घरी सोडले. मग मी काही दिवस कामावर जाणे टाळले. मात्र, मी मध्येच काम सोडले तर पैसे देणार नाही असे त्यांनी सांगितल्याने मला पुन्हा कामावर जावे लागले", असा धक्कादायक आरोप या महिलेने केला.
सुभाष घई यांच्यासोबत एका सिनेमाचं काम सुरु होतं. त्यावेळी मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते. त्यामुळे मी शिकण्यासाठी उत्सुक होते. बॉलिवूडमध्ये माझा कोणीही गॉडफादर नव्हता, त्यामुळे सुभाष घई हे मला मार्गदर्शन करत असल्याने मी ते सांगतील ते करत होते. मी मुंबईची नाही, पण मी मेहनतीसाठी नेहमीच तयार होते. मी एक चांगली डायरेक्टर होऊ शकते हे मला माझ्या आई वडिलांना दाखवायचं होतं, असं या महिलेने म्हटलं आहे.
सुरुवातीला सुभाष घई मला रेकॉर्डिंग स्टुडिओत घेऊन जात असत. तिथे अनेक पुरुष मंडळींसह रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवत. रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी रिक्षाने घरी जात असे किंवा सुभाष घई मला सोडत होते. एके दिवशी त्यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला आणि मला बाहूपाशात घेत चांगलं काम केलं असं सांगितलं. त्यानंतर ते मला लोखंडवाला इथल्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये स्क्रिप्टसेशनसाठी बोलावत असत. दुसऱ्या अभिनेत्रींसोबतही मी इथेच स्क्रिप्ट वाचत असतो, असं ते सांगत होते.
तिथे ते इंडस्ट्रीमधील लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात, पण तू एकटीच आहेस मला समजून घेतेस असं सांगत सुभाष घई रडू लागले. त्यानंतर ते हळूहळू माझ्यावर जबरदस्ती करु लागले, त्यांच्या त्या वर्तनाने मला धक्का बसला, असं या महिलेने म्हटलं.
संबंधित बातम्या
MeToo: सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधील विद्यार्थिनीही म्हणाली, मी टू!
#MeToo : एमजे अकबर यांना परदेश दौऱ्यावरुन परत बोलवलं!
मुंबई | #MeToo च्या वादळात पहिल्यांदाच एका महिलेचा महिलेवरच आरोप
#MeToo : गायिका सोना मोहापात्राचे कैलाश खेरवर गैरवर्तनाचे आरोप
बलात्काराच्या आरोपांनंतर आलोकनाथ यांची प्रकृती बिघडली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
क्राईम
Advertisement