एक्स्प्लोर

'छपाक'मध्ये अॅसिड फेकणाऱ्याचा धर्म बदलला? काय आहे सत्य?

मेघना गुलजार दिग्दर्शित अभिनेत्री दीपिका पादूकोणचा 'छपाक' चित्रपट उद्या म्हणजे 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई : दिल्लीच्या जेएनयूतील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर आंदोलनात अभिनेत्री दीपिका पादूकोण सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत मोहीम सुरु झाली. त्यात भर म्हणून चित्रपटात दीपिकाच्या व्यक्तिरेखेवर अॅसिड टाकणाऱ्या मुख्य आरोपीचा धर्म बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे. तशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'छपाक' सिनेमा हा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिकाच्या व्यक्तिरेखेचं नाव मालती आहे. खऱ्या आयुष्यात लक्ष्मी अग्रवालवर अॅसिड टाकणाऱ्या आरोपीचं नाव नदीम खान होतं आणि चित्रपटात त्याचं नाव राजेश करण्यात आल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. पण चित्रपटात असं काही नसून अॅसिड टाकणाऱ्या व्यक्तिरेखेचा उल्लेख वास्तवातील नावाशी साधर्म्य दाखवतो. छपाक'मध्ये अॅसिड फेकणाऱ्याचा धर्म बदलला? काय आहे सत्य? व्हायरल फोटो छपाक'मध्ये अॅसिड फेकणाऱ्याचा धर्म बदलला? काय आहे सत्य? व्हायरल फोटो 'छपाक'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला त्यावेळी सगळ्याच स्तरातून दीपिका आणि मेघना गुलजारचं कौतुक झालं होतं. संवेदनशील विषय हाताळल्यामुळे दोघींवरही स्तुतीसुमनं उधळली जात होती. अगदी काही दीपिकाने जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याआधीपर्यंत तिचं कौतुक सुरु होतं. मात्र दोन दिवसांपूर्वी दीपिकाने जेएनयूमध्ये उपस्थिती लावली आणि जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषची विचारपूस केली. मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु त्यानंतर सोशल मीडियावर 'छपाक'वर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु झाली होती. दुसरीकडे दीपिकाला पाठिंबा देण्याबाबतही हॅशटॅग ट्रेण्ड झाला होता. दरम्यान, मेघना गुलजार दिग्दर्शित अभिनेत्री दीपिका पादूकोणचा 'छपाक' चित्रपट उद्या म्हणजे 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संबंधित बातम्या #JNU Attack : अभिनेत्री दीपिका पादुकोण जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला; विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोषची घेतली भेट 'छपाक'च्या रिलीजचा मार्ग मोकळा; सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी घेतली मागे छपाक' विरोधात हायकोर्टात याचिका निव्वळ पैसे उकळण्यासाठी, मेघना गुलझार यांचा हायकोर्टात आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget