एक्स्प्लोर

छपाक' विरोधात हायकोर्टात याचिका निव्वळ पैसे उकळण्यासाठी, मेघना गुलझार यांचा हायकोर्टात आरोप

अॅसिड हल्यासारख्या भयानक घटनेतून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांची कहाणी सांगणाऱ्या दीपिका पादुकोणच्या आगामी छपाक सिनेमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे.

 मुंबई : दीपिकाच्या 'छपाक' या आगामी सिनेमाविरोधात दाखल याचिका ही तथ्यहीन असून ती केवळ निर्मात्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनंच दाखल करण्यात आली आहे. मुळात सत्यघटनेवर आधारीत कथा असताना त्यावर कुणीही आपला अधिकार सांगूच शकत नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणी सिनेमाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक मेघना गुलझार यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे.
अॅसिड हल्यासारख्या भयानक घटनेतून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांची कहाणी सांगणाऱ्या दीपिका पादुकोणच्या आगामी छपाक सिनेमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. लेखक राकेश भारती यांनी आपली नोंदणीकृत कथा चोरून निर्मात्यांनी हा सिनेमा बनवल्याचा आरोप करत कॉपीराईट कायद्याअंतर्गत हायकोर्टात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते यांच्यापुढे यावर मंगळवारी सुनावणी झाली,  बुधवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.
येत्या शुक्रवारी प्रदर्शनासाठी सज्ज असलेला मेघना गुलझार यांचं दिग्दर्शन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेल्या 'छपाक'ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र छपाकची मूळ संकल्पना आणि कथा आपली असून त्याबाबतची रितसर नोंदणीही 'इंडियन मोशन पिक्‍चर्स असोसिएशन' (इंपा)कडे करण्यात आली आहे. 'ब्लॅक डे' या नावानं फेब्रुवारी 2015 मध्येच ही नोंदणी केली होती, असा दावा राकेश भारती यांनी आपल्या याचिकेत केला आहे. यावर सिनेमा बनविण्यासाठी आपण अनेक कलाकार आणि निर्मात्यांकडे चर्चा केली होती. ज्यामध्ये फॉक्‍स स्टार स्टुडिओचाही समावेश होता. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे या सिनेमाचं काम होऊ शकतं नाही, असं आपल्याला सांगण्यात आलं. मात्र आता याच पटकथेवर फॉक्‍स स्टारचा हा सिनेमा येत असल्याचं कळताच धक्का बसला. त्यामुळे कंपनीकडे याबाबत तक्रार केली, मात्र त्यांनी काहीच दाद न दिल्यामुळे हायकोर्टात दाद मागितल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
Chhapaak | छपाक सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाशी सोनाली कुलकर्णीने साधलेला खास संवाद | ABP Majha
निर्मात्यांनी लेखकांच्या यादीमध्ये आपल्याला श्रेय द्यावे, अन्यथा सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे. आवश्‍यकता वाटल्यास छपाकची पटकथा आणि आपली पटकथा जाणकारांकडून तपासावी, अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. गेल्या महिन्यात ही याचिका हायकोर्टात दाखल झाली होती. मात्र याचिकाकर्त्यांचा हा दावा कायद्यात बसणारा नसून निव्वळ सवंग प्रसिद्ध आणि कॉपीराईटच्या नावाखाली निर्मात्यांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशानं ही याचिका दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
झाडं तोडली हे मान्यच पण त्यापेक्षा हरित ऊर्जा महत्त्वाची, आपण 300 कोटी झाडं लावणार, प्रकल्पातून पर्यावरणाचे नुकसान नाही : चंद्रशेखर बावनकुळे
झाडं तोडली हे मान्यच पण त्यापेक्षा हरित ऊर्जा महत्त्वाची, आपण 300 कोटी झाडं लावणार, प्रकल्पातून पर्यावरणाचे नुकसान नाही : चंद्रशेखर बावनकुळे

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
Embed widget