एक्स्प्लोर
धोनीकडून बायोपिकच्या राईट्सची 80 कोटींना विक्री
नवी दिल्लीः टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जिवनावर आधारित सिनेमा 'धोनी दी अनटोल्ड स्टोरी' प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. धोनीने निर्मात्यांना या सिनेमाचे हक्क 80 कोटींना विकले, अशी सध्या चर्चा सुरु आहे. निर्मात्यांकडून धोनीला यापैकी 20 कोटी रुपये अगोदरच देण्यात आले आहेत.
भारतात विकण्यात आलेल्या सिनेमांपैकी हा सर्वात महागडा सिनेमा आहे. धोनीला 20 कोटी रुपये अगोदरच दिले गेले असले तरी सिनेमाच्या कमाईतून मिळणारे फायदे आणि रॉयल्टी यांच्यामधील शेअर्स देखील दिले जाणार आहेत, अशी माहिती आहे.
यापूर्वी बॉक्सर मेरी कोम, धावपटू मिल्खा सिंह आणि क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमे बनवण्यात आले आहेत. मात्र यांच्या तुलनेत ही रक्कम किती तरी पटीने अधिक आहे. मेरी कोमने केवळ 25 लाख रुपये घेतले होते. ही रक्कम खेळाडूंसाठी एका अकादमीला दिली. अझरुद्दीनने निर्मात्यांना या सिनेमाचे हक्क मोफत दिले आहेत. तर मिल्खा सिंह यांनी निर्मात्यांच्या आग्रहास्तव केवळ एक रुपया घेतला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement