एक्स्प्लोर
'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर
करनी सेनेने ज्या रांगोळीची नासधूस केली, ती रांगोळी काढण्यासाठी 48 तास लागले होते.
!['पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर Deepika Get Disappointed After Karni Sena Protest Against Padmavati 'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/18224411/padmavati-rangoli.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला राजपूत करनी सेनेचा विरोध कायम आहे. सुरतमधील राहुल राज मॉलमध्ये काढण्यात आलेली ‘पद्मावती’ची रांगोळी पुसून टाकत करनी सेनेने जोरदार गोंधळ केला.
करनी सेनेने ज्या रांगोळीची नासधूस केली, ती रांगोळी काढण्यासाठी 48 तास लागले होते. कलाकाराने 48 तास एका जागेवर बसून ही रांगोळी काढली होती. त्यामुळे ही नासधूस पाहून सिनेमात पद्मावतीची भूमिका साकरत असलेल्या दीपिका पदुकोणचा संताप अनावर झाला.
https://twitter.com/deepikapadukone/status/920617861340680192
हे कुठे तरी थांबायला हवं आणि अशा कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई व्हायला हवी, अशी मागणी दीपिकाने माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली.
यापूर्वीही राजस्थानमध्ये पद्मावतीच्या सेटवर जाऊन करनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता आणि संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की केली होती.
दरम्यान पद्मावती सिनेमा सध्या आहे तसाच प्रदर्शित झाल्यास आम्हाला विरोध करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा इशारा करनी सेनेने दिला आहे.
संबंधित बातमी : 'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)